Durand Cup 2023
Durand Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup 2023: आशियातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात, पहिल्यांदाच 24 संघ सहभागी; पाहा संपूर्ण डिटेल्स

Manish Jadhav

Durand Cup 2023: आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा ड्युरंड चषक आजपासून (3 ऑगस्ट) सुरु होत आहे. आजपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेचा हा 132 वा हंगाम आहे. ही स्पर्धा 3 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

ड्युरंड चषकाचा सलामीचा सामना मोहन बागान सुपर जायंट विरुद्ध बांगलादेश आर्मी यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा कोलकाता (Kolkata), गुवाहाटी आणि कोक्राझार येथे आयोजित केली जात आहे.

24 संघ प्रथमच सहभागी होत आहेत

इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी होत आहेत. सर्व संघांची 6 गटात विभागणी करण्यात आली आहे. ड्युरंड कपच्या मागील हंगामात म्हणजे 2022 मध्ये एकूण 20 संघ सहभागी झाले होते.

बंगळुरु एफसीने विजेतेपद पटकावले होते

दरम्यान, गेल्या वर्षी बंगळुरु एफसीने ड्युरंड कपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली होती. हा गतविजेता संघ आहे. स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील संघाने कोलकाता येथे झालेल्या अंतिम फेरीत मुंबई सिटी एफसीचा 2-1 असा पराभव केला होता.

ड्युरंड कप 2023 चा थरार

तुम्ही सोनी टेन 2 आणि सोनी टेन 2 एचडी वर ड्युरंड कप 2023 चे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

ड्युरंड कप 2023 संघ

अ गट - बांगलादेश आर्मी फुटबॉल संघ, ईस्ट बंगाल एफसी, मोहन बागान सुपर जायंट्स, पंजाब एफसी

ब गट - भारतीय नौदल फुटबॉल संघ, जमशेदपूर एफसी, मोहम्मडन एससी, मुंबई सिटी एफसी

क गट - बंगळुरु एफसी, गोकुलम केरळ एफसी, भारतीय वायुसेना फुटबॉल संघ, केरळ ब्लास्टर्स एफसी

गट ड - डाउनटाउन हीरोज एफसी, एफसी गोवा, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी, शिलाँग लाजोंग एफसी

गट ई - चेन्नईयन एफसी, दिल्ली एफसी, हैदराबाद एफसी, त्रिभुवन आर्मी एफसी

गट एफ - भारतीय सेना फुटबॉल संघ, बोडोलँड एफसी, ओडिशा एफसी, राजस्थान युनायटेड एफसी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाच फूट अन् 45 किलोचा एक घड! सत्तरीतील शेतकऱ्याची कमाल; टिश्यू कल्चर पद्धतीनं घेतलं केळीचं उत्पादन

Goa Weather Update: ....तर गोव्यात भूस्खलनाचा धोका; डॉ. कामत

Margao: 'मला फरक नाही पडत', सरदेसाईंच्या जनता दरबारावर माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

Goa Traffic Police: बेकायदेशीर होर्डिंग्सविरुद्ध ‘एसओपी’ जारी; धडक मोहीम सुरू

Goa Today's News Live: दामोदर सप्ताहाचे यंदा 125वे वर्ष, 1 कोटी महसूलाचे टार्गेट!

SCROLL FOR NEXT