Durand Cup 2022: ‘एफसी गोवा’स गुण नोंदविण्याची संधी

ड्युरँड कप फुटबॉल : इंडियन एअर फोर्सविरुद्ध महत्त्वाचा सामना
FC Goa
FC Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या गतविजेत्या एफसी गोवा संघाला ड्युरँड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, आता 'अ' गटातील दुसऱ्या साखळी लढतीत त्यांच्यासमोर इंडियन एअर फोर्स संघाचे आव्हान असेल, त्यावेळी गुण नोंदविण्यासाठी डेगी कार्दोझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ प्रयत्नशील असेल.

मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबविरुद्ध एफसी गोवाने मुहम्मद नेमिल याच्या गोलमुळे पूर्वार्धात आघाडी घेतली, मात्र उत्तरार्धात त्यांचा खेळ ढेपाळला आणि 1-3 फरकाने पराभव पत्करावा लागला. शुक्रवारी (ता.19) एफसी गोवा संघाला एअर फोर्स संघापासून सावधच राहावे लागेल. हवाई दलाचा हा संघ धोकादायक आहे. शुक्रवारी ते यावेळच्या स्पर्धेतील पहिला सामना खेळतील. सामना कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर होईल.

FC Goa
Sancoale: फ्लॅटमध्ये घुसून महिलेचा विनयभंग, 53 वर्षीय आरोपीला अटक

महत्त्वाची लढत

एफसी गोवा संघाला अ गटातील आव्हान कायम राखण्यासाठी एअर फोर्सविरुद्ध जिंकावेच लागेल. ‘‘आम्ही चांगला सराव केला असून खेळाडू सामन्यासाठी सज्ज आहेत. मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्धचा पराभव विसरावा लागेल. त्या लढतीत अपेक्षित निकाल मिळाला नाही, त्याचा विचार करून आता काहीच फायदा नाही. आम्ही आता पुढे काय करणे आवश्यक आहे यावरच लक्ष केंद्रित केले आहे,’ असे एफसी गोवाचे प्रशिक्षक डेगी कार्दोझ यांनी सांगितले.

काही चुका नडल्या

डेगी कार्दोझ म्हणाले, ‘‘प्रत्येक सामना जिंकणे हेच आमचे ध्येय आहे, आम्ही ते साध्य करू शकतो. मंगळवारच्या लढतीत काही वैयक्तिक चुका नडल्या. खेळाडूंतील समन्वयासाठी प्रगती हवी असून त्यादृष्टीने भर दिला आहे. एकंदरीत एअर फोर्सविरुद्ध आम्ही चांगली कामगिरी करू अशी आशा आहे.’’

FC Goa
'100 टक्के हर घर जल' धडधडीत खोटं, मुख्यमंत्र्यांनी दावा सिद्ध करावा; संकल्प आमोणकर

बुआम, तिवारीची छाप

मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध विंगर फ्रांग्की बुआम, गोलरक्षक ह्रतीक तिवारी यांनी छाप पाडली. ‘‘संघ या नात्याने आम्ही पहिल्या लढतीत निराशा केली, त्यामुळे पराभूत व्हावे लागले. आम्ही आणखी चांगली बजावू शकतो याचा विश्वास आहे,’’ असे बुआम म्हणाला. गोलरक्षक तिवारीने अफलातून दक्षता प्रदर्शित केले, त्यामुळे एफसी गोवा संघ मोठ्या पराभवापासून बचावला. वैयक्तिक कामगिरीने समाधानी असलो, तरी सांघिक पातळीवर आणखी चांगला खेळू करू शकतो, असे तो म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com