Ajay Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

'त्याला संघ चालवायला शिकवू नका', अजय जडेजाचा बीसीसीआयला कानमंत्र

भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज असणाऱ्या राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज असणाऱ्या राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारी क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड केली. T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. T20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ पुढे जाणार आहे. राहुल द्रविड भारत-न्यूझीलंड मालिकेपासून प्रशिक्षकपदाची सुरुवात करणार आहे.

दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) 'संघ कसा चालवायचा' हे सांगण्याऐवजी टीम इंडियाचा (Team India) मुख्य प्रशिक्षक बनलेल्या राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) दृष्टीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. योगायोगाने, बीसीसीआयने बुधवारी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) 2021 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक संपल्यानंतर द्रविड शास्त्री यांची जागा घेणार आहे. क्रिकबझशी बोलताना अजय जडेजाने म्हणाला, द्रविड हा 'शिस्त आणि समर्पणाचा आदर्श' आहे. त्याला संघ चालवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे.

“शिस्त आणि समर्पणाचा आदर्श म्हणून राहुल द्रविडकडे पाहिले जाते. तुम्हाला प्रशिक्षकाकडून खूप काही हवे आहे, पण शिस्त आणि समर्पण या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पंरतु जेव्हा एखादा भारतीय प्रशिक्षक बनतो, तेव्हा तुम्ही त्याला काम करु दिले नाही किंवा त्याच्या दृष्टीकोनाला वाव नाही दिला हे सर्व निरर्थक आहे. तशा मानसिकतेमध्ये कोणीही संघाला प्रशिक्षण देऊ शकणार नाही,' असंही जडेजा म्हणाला.

“म्हणून जर तुम्ही राहुल द्रविडकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली असेल, तर किमान त्याच्या व्हिजननुसार जा. ही माझी बोर्डाला विनंती आहे... जर राहुल द्रविडसारखा कोणी सामील झाला असेल, तर कृपया त्याची दृष्टी, समज आणि समर्पणाने पुढे जा, त्याला संघ कसा चालवायचा हे सांगू नका,' असही तो म्हणाला

तो सर्वोत्तम व्यक्ती आहे

माजी सहकारी वीरेंद्र सेहवागने देखील राहुल द्रविडचे कौतुक केले असून त्याला या पदासाठी सर्वात योग्य उमेदवार म्हटले आहे. द्रविड अंडर-19 आणि 'अ' संघातील खेळाडूंशी कसा संवाद साधायचा याचाही सेहवागने यावेळी बोलताना उल्लेख केला आहे. तसेच त्याच्या गुणवत्तेमुळे टीम इंडियाची धावसंख्या सुधारण्यास मदत होईल, असेही त्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT