Brazil FIFA WC Dainik Gomantak
क्रीडा

Brazil FIFA WC: मांजर ठरली ब्राझीलच्या विजयातील अडथळा? पाहा नक्की का होतेय चर्चा

ब्राझीलच्या पराभवाला हेच कारण आहे असे नेटकरी बोलत आहेत.

दैनिक गोमन्तक

फिफा वर्ल्डकपमधील ब्राझीलला पराभव स्वीकारावा लागला आहे. शुक्रवारी म्हणजेच 9 डिसेंबर झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलचा 4-2 असा पराभव केला. या पराभवामुळे ब्राझीलचे सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले आहे. ब्राझीलने त्यांचे शेवटचे वर्ल्ड कप विजेतेपद 2022 मध्ये जिंकले होते.

या पराभवानंतर ब्राझील संघाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. तसेच या पराभवास नेटकऱ्यांनी एक वेगळेच कारण दिले आहे. ब्राझीलच्या पत्रकार परिषदेत ब्राझीलच्या स्टाफमधील एका सदस्याने मांजरीला फेकून दिले होते, त्याच मांजरीचा शाप ब्राझीलला लागल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या दरम्यान, त्या पत्रकार परिषदेतील त्या प्रसंगाचा व्हिडीओही व्हायरल केला जात आहे.

  • मांजरीला टेबलवरुन खाली फेकून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल

ब्राझीलचा स्टार विंगर व्हिनिशियस ज्युनियरच्या पत्रकार परिषदेदरम्यान ही घटना घडली होती. पत्रकार परिषद सुरु असताना व्हिनिसियस ज्युनिअरच्या समोरील टेबलावर एक मांजर आली, तेव्हा ब्राझीलच्या मीडिया अधिकाऱ्याने त्या मांजरीला उचलून व्यासपीठावरून खाली फेकून दिले. या ब्राझिलियन मीडिया अधिकाऱ्याने टेबलावरील मांजरीला आधी आपल्या हातात घेतले. प्रेमाने मांजरीच्या पाठीवर हात फिरवला आणि त्यानंतर त्याने मांजरीला फेकून दिले. यामुळे नेटकरी ब्राझील संघाच्या स्टाफमधील सदस्यावर संतापले होते. आता ब्राझीलच्या पराभवाला हेच कारण आहे असे नेटकरी बोलत आहेत.

  • सोशल मीडियावर ब्राझीलचा संघ ट्रोल

हा व्हिडीओ (Video) व्हायरल झाल्यापासून सोशल मीडिया (Social Media) यूजर्सनी ब्राझीलच्या या पराभवाला 'कर्म' शब्द जोडून ट्रोल केले आहे. म्हणजेच ब्राझील संघाला या मांजराचा शाप लागला आहे, असे युजर्सचे मत आहे. ही पत्रकार परिषद ब्राझील संघाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी होती.

हा व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'ब्राझीलला या मांजरीचा शाप लागला आहे.' तर आणखी एका युजरने ब्राझीलच्या पराभवापूर्वी ट्विट करत म्हटले होते की, ब्राझील हा विश्वचषक जिंकत नाही आहे. या युजरने त्याच मांजरीचा व्हिडिओही शेअर केला होता.

  • कतारमधूनही प्रचंड टीका

मांजर उचलून फेकण्याच्या या घटनेवर कतारमध्येही बरीच टीका झाली होती. याचे कारण असे की आखाती देशांमध्ये, विशेषत: कतारमध्ये मांजर आणि त्याच्या प्रजातीच्या प्राण्यांचा खूप आदर केला जातो. पत्रकार परिषद सुरू असतानाही काही पत्रकारांनी असे करण्यापूर्वी ब्राझीलच्या प्रेस अधिकाऱ्याला अडवले होते. त्यावर अधिकाऱ्याने आपण फक्त मांजर काढून दुसरीकडे सोडत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: मोपा विमानतळावर सॅटेलाईट डिव्हाईस बाळगणाऱ्या रशियन नागरिकाविरोधात एका दिवसात गुन्हा आणि आरोपपत्र दाखल

Colvale Jail: गुन्‍हेगाराला ‘माणूस’ बनवणार! कोलवाळ येथे होणार अर्धमुक्त कारागृह; आराखडा बनविणे सुरू

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती'वर दिवसरात्र लक्ष, लवकरच रेस्क्यू करण्यात येणार; वन विभागाचे पथक पाळतीवर

NASA Space Challenge: नासा स्पेस चॅलेंज! गोव्यातील 38 संघ सहभागी; ग्लोबल नासा हॅकेथॉन 2025 अंतर्गत पर्वरीत आयोजन

SCROLL FOR NEXT