dinesh karthik needs 45runs to become the highest run scorer in ipl history vs rajasthan royals Dainik Gomantak
क्रीडा

दिनेश कार्तिक बनला डिव्हिलियर्सचा विक्रम मोडणारा पहिला फलंदाज

ऐतिहासिक कामगिरी करण्यापासून कार्तिक फक्त 45 धावा दूर आहे

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना 27 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ 29 मे रोजी IPL 2022 चा अंतिम सामना गुजरात टायटन्ससोबत खेळेल, तर पराभूत संघ मायदेशी जाईल. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर असेल. ज्याने या मोसमात बंगळुरूसाठी फलंदाजीने चमत्कारिक कामगिरी केली आहे. तो अशा 5 फलंदाजांपैकी एक आहे ज्याचा स्ट्राईक रेट या हंगामातील सर्वोच्च आहे. या मोसमात त्याने 15 सामन्यांच्या 15 डावात 10 वेळा नाबाद असताना 324 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 187.28 होता. डीकेच्या नावावर या मोसमात अर्धशतकही नोंदवले गेले आहे.कार्तिक राजस्थानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याच्या जवळ आहे.

आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची संधी दिनेश कार्तिककडे आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करण्यापासून कार्तिक फक्त ४५ धावा दूर आहे. यष्टिरक्षक फलंदाजाने आयपीएलच्या पहिल्या चॅम्पियनविरुद्ध इतक्या धावा केल्या तर लीगच्या इतिहासात तो राजस्थानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.कार्तिकच्या सध्या राजस्थानविरुद्ध 608 धावा आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार कार्तिकने राजस्थानविरुद्ध 29 आयपीएल सामने खेळले आहेत ज्यात त्याने 37 च्या सरासरीने आणि 35.95 च्या स्ट्राइक रेटने 608 धावा केल्या आहेत.(dinesh karthik needs 45runs to become the highest run scorer in ipl history vs rajasthan royals)

राजस्थानविरुद्ध त्याने आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावली आहेत. राजस्थानविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सध्या कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.राजस्थानविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एबी डिव्हिलियर्स सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

डिव्हिलियर्सने राजस्थानविरुद्धच्या 22 सामन्यात 652 धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्सने आता आयपीएलसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारा सुरेश रैना दुसरा फलंदाज आहे. रैनाच्या राजस्थानविरुद्धच्या 23 सामन्यात 630 धावा आहेत. कार्तिकला आता रैना आणि डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्याची संधी आहे. याचबरोबर शिखर धवन 564 धावांसह चौथ्या आणि रोहित शर्मा 455 धावांसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT