Dhoni started crying while giving speech Dainik Gomantak
क्रीडा

अचानक भाषण देताना धोनीच्या डोळ्यात आले होते अश्रू; काय आहे किस्सा...

जेव्हा CSK 2018 मध्ये IPL मध्ये परतला तेव्हा धोनीने आपल्या टीमसाठी भाषण केले होते. त्यावेळी तो खरोखर रडत होता.

दैनिक गोमन्तक

चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीमचे दोन माजी खेळाडू काही जुन्या गोष्टी शेअर करताना दिसत आहेत. 'सुपर रियुनियन' नावाच्या या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलिया आणि सीएसकेचे माजी क्रिकेटपटू मायकेल हसी आणि मॅथ्यू हेडन यांच्यात दीर्घ संभाषण होते. या संवादात हशा आणि विनोद तर आहेच, त्याचबरोबर काही जुने खास क्षणही आहेत. असाच एक क्षण माईक हसीने शेअर केला आहे, जो महेंद्रसिंग धोनीशी संबंधित आहे.

जेव्हा 2013 चे स्पॉट-फिक्सिंग प्रकरण उघडकीस आले तेव्हा CSK ला 2016 आणि 2017 मध्ये IPL मधून निलंबित करण्यात आले होते. या काळात धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व केले. यानंतर जेव्हा CSK 2018 मध्ये IPL मध्ये परतला तेव्हा धोनीने आपल्या टीमसाठी भाषण केले होते. मायकल हसीने या भाषणाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे.

मायकल हसी म्हणतो, 'आम्ही दोन वर्षे आयपीएलमधून बाहेर होतो. आम्ही परत आलो आणि मला आठवते की एमएस धोनीने सीझनच्या सुरुवातीला भाषण दिले होते. त्यावेळी तो खरोखर रडत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मला आठवतंय त्यावेळी मी विचार करत होतो की यावेळी काहीतरी विशेष घडणार आहे. तो एक खास हंगाम होता. एमएस धोनीने त्या संपूर्ण IPL हंगामात चमकदार कामगिरी केली होती. तो खूप खास काळ होता.'

2018 मध्ये चेन्नईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्या हंगामात, चेन्नईने लीग टप्प्यातील 14 पैकी 9 सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. प्लेऑफमध्ये चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यातही चेन्नईचा सामना पुन्हा एकदा हैदराबादविरुद्ध होता. या सामन्यात चेन्नईने 179 धावांचे लक्ष्य केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले आणि आयपीएल ट्रॉफी जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT