Shikhar Dhawan Dainik Gomantak
क्रीडा

धवन ब्रदर्सची IPLमध्ये चर्चा, जाणून घ्या शिखर-ऋषी-राघव यांच्यातील नात्याचे गुपीत

6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आलेल्या धवनने ही निवड योग्य असल्याचे सिद्ध केले

दैनिक गोमन्तक

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्जने ऋषी धवनला (Rishi dhawan) संधी दिली. 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आलेल्या धवनने ही निवड योग्य असल्याचे सिद्ध करत 2 विकेट्स घेत पंजाबच्या 11 धावांनी मिळवलेल्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

धवन (shikhar dhawan) जगातील सर्वात मोठ्या T20 लीगमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) कडून शेवटचा खेळला होता. यानंतर 2017 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्याला विकत घेतले, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. हिमाचल प्रदेशच्या धवनने गेल्या वर्षी आपल्या घरच्या संघाचे नेतृत्व करत विजय हजारे करंडक विजेतेपद पटकावले होते. तो या स्पर्धेत दुसरा सर्वाधिक बळी घेणारा आणि सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. देशांतर्गत क्रिकेटमधील या पराक्रमानंतरच धवनला आयपीएल 2022 मध्ये ही संधी मिळाली. धवनने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) पहिला आयपीएल सामना खेळला होता.

ऋषी धवन आणि शिखर धवन यांचे नाते काय?

ऋषी धवन हा भारताचा सलामीवीर शिखर धवनचा भाऊ असल्याचे म्हटले जाते कारण त्याने चेन्नईच्या फलंदाजांना आपल्या गोलदाजीच्या तालावर नाचवले होते. त्यामुळे ऋषी धवन आणि पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन हे दोघेही खूप चर्चेत आहेत.

ऋषी आणि शिखर यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, दोघांमध्ये कोणतेही नाते नाही. ऋषीचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला, तर शिखरचा जन्म दिल्लीत झाला. आयपीएल 2022 मध्ये एकाच संघासोबत खेळण्याव्यतिरिक्त, ऋषीने शिखरसोबत भारतासाठी 3 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. शिखर धवनला कोणताही भाऊ नाही, तर ऋषी धवनला एक मोठा भाऊ आहे, त्याचे नाव राघव धवन आहे. राघव हा देखील एक क्रिकेटर आहे आणि तो हिमाचल प्रदेशकडून खेळतो हे क्वचितच लोकांना माहीत असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT