Team India | India vs England 5th Test Dharamsala AFG
क्रीडा

IND vs ENG: 23 वर्षीय पडीक्कलचे पदार्पण? बुमराहही करणार पुनरागमन, पाचव्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची 'प्लेइंग-11'

India Predicted Playing XI: धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाचव्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होऊ शकते.

Pranali Kodre

India Predicted Playing XI for 5th Test against England:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेच्या निकालाच्यादृष्टीने या सामन्याला फार महत्त्व नाही. परंतु, ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असल्याने हा सामना त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.

दरम्यान, या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी दिली जाणार, हा मोठा प्रश्न आहे. या मालिकेत आधीच 4 खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले आहे. आता पाचव्या कसोटीत आणखी एका खेळाडूला पदार्पणाची संधी भारतीय संघाकडून मिळू शकते. हा खेळाडू म्हणजे देवदत्त पडीक्कल.

23 वर्षीय पडीक्कला या सामन्यासाठी केएल राहुलच्या जागेवर भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याचीही संधी मिळू शकते.

पडीक्कलला प्लेइंग इलेव्हनमध्ये रजत पाटीदारच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. रजत पाटीदार भारताकडून दुसरा, तिसरा आणि चौथा कसोटी सामना खेळला आहे. पण त्याला आत्तापर्यंत त्याची छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे आता त्याला वगळून पडीक्कलला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे.

याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराहचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते. त्याला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती. पण तो शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघात सामील झाला आहे. त्यामुळे त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे पक्के आहे.

मात्र, बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये जर परत आला, तर मोहम्मद सिराज किंवा आकाश दीप यांच्यापैकी एकादा बाहेर बसावे लागणार आहे किंवा जर तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली, तर भारतीय संघव्यवस्थापनेला दोनच फिरकी गोलंदाज खेळवाव लागतील.

पण, मीडियातील रिपोर्ट्सनुसार धरमशालाची खेळपट्टी फिरकीला पोषक असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे तिघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

बाकी अन्य मोठे बदल भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होण्याची शक्यता कमी आहे.

पाचव्या कसोटीसाठी अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पडीक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आकाश दीप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मडगावात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

Anupam Kher At IFFI: 'भिगा हुआ आदमी बारिशसे नहीं डरता'; अनुपम खेर अपयशाबद्दल म्हणाले की...

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT