Bandodkar T-20 League Dainik Gomantak
क्रीडा

Bandodkar T-20 League: विजय नोंदवूनही धेंपो क्लब ‘आऊट’, पणजी जिमखाना ‘ब’ गटात अव्वल स्थानी

‘ब’ गटात अव्वल स्थान मिळविताना यजमान पणजी जिमखान्याने जीनो स्पोर्टस क्लबला ५६ धावांनी नमविले.

किशोर पेटकर

Bandodkar T-20 League:  बांदोडकर करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात धेंपो क्रिकेट क्लबने चौगुले स्पोर्टस क्लबवर २५ धावांनी शानदार विजय नोंदविला, तरीही धावसरासरीत कमी ठरल्यामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. सामना कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

‘ब’ गटात अव्वल स्थान मिळविताना यजमान पणजी जिमखान्याने जीनो स्पोर्टस क्लबला ५६ धावांनी नमविले. या दोन्ही संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली होती, त्यामुळे गटविजेता ठरविण्यासाठी गुरुवारची लढत महत्त्वाची होती. एमसीसी संघ दोन्ही लढती गमावल्यामुळे स्पर्धेतून बाहेर गेला. पणजी जिमखान्याचे सलग दुसऱ्या विजयामुळे चार गुण झाले, तर जीनो क्लबचे दोन गुण कायम राहिले.

अ गटात प्रत्येकी दोन गुण झाल्यानंतर चौगुले क्लब (०.५३२) व साळगावकर क्रिकेट क्लब (-०.०१४) या दोन्ही संघांनी चांगल्या गोलसरासरीवर उपांत्य फेरी गाठली. -०.५०० या तिसऱ्या क्रमांकावरील धावसरासरीमुळे धेंपो क्लबला पुढील फेरीत दाखल होता आले नाही.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब: २० षटकांत ८ बाद १७४ (मंथन खुटकर ५५, दीप कसवणकर २४, आकाश पारकर २२, सागर मिश्रा १८, विकास सिंग नाबाद २६, मोहित रेडकर २-२२, स्पर्श जैन १-१४, जगदीश पाटील १-२८, शिवम आमोणकर १-२६, कृष्णा ठाकूर २-३७) विजयी विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब: १७.३ षटकांत सर्वबाद १४९ (शिवम आमोणकर २२, समर दुभाषी २९, वीर यादव २३, दिव्यांश ४०, सागर मिश्रा १-३६, फरदिन खान २-३२, आकाश पारकर ३-२४, रोहन बोगाटी ३-१८), सामनावीर: आकाश पारकर (धेंपो).

पणजी जिमखाना: २० षटकांत ८ बाद १५८ (स्नेहल कवठणकर १८, राजशेखर हरिकांत २४, अझान थोटा २८, ध्रुमिल मतकर २६, तुनीष सावकार १५, आर्यन १-३५, मानस ३-३९, अमित यादव १-२५, कौशल हट्टंगडी २-३०, योगेश कवठणकर १-१४) विजयी विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब: १४.३ षटकांत सर्वबाद १०२ (सनथ नेवगी २३, सागर वंटमुरी १७, शुभम तारी २-१४, तनय त्यागराजन २-१०, ध्रुमिल मतकर २-११, अचित शिगवण १-१०, मेहंक धारवाडकर १-३१, शुभम देसाई २-२१), सामनावीर: ध्रुमिल मतकर (पणजी जिमखाना).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT