MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

मानहानीच्या खटल्याची 29 जानेवारीला होणार सुनावणी; हायकोर्ट म्हणाले- ''धोनीला याची माहिती द्या''

Delhi High Court: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधित खटल्याची गुरुवारी (18 जानेवारी रोजी) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Manish Jadhav

Delhi High Court: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधित खटल्याची गुरुवारी (18 जानेवारी रोजी) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, उच्च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीला माजी कर्णधार एमएस धोनीला कळवण्यास सांगितले की, त्याच्या दोन व्यावसायिक भागीदारांनी त्याच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.

फिर्यादी आणि माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि त्यांची पत्नी सौम्या दास यांनी उच्च न्यायालयात धाव घेत धोनी, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया हाऊस यांच्या विरोधात स्थायी आदेश आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यांना बदनामीकारक वक्तव्ये प्रकाशित, प्रसारण आणि प्रसारित करण्यापासून प्रतिबंधित करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, ही याचिका न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांच्यासमोर मांडण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आले की फिर्यादींनी या याचिकेबाबत धोनीला माहिती दिली नव्हती. यावर न्यायमूर्तींनी रजिस्ट्रीला क्रिकेटपटू धोनीला ईमेलद्वारे कळवण्यास सांगितले की, दोन माजी व्यावसायिक भागीदारांनी त्याच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.

दुसरीकडे, न्यायालयाने या प्रकरणावरील पुढील सुनावणी 29 जानेवारी निश्चित केली आहे. धोनीचा माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या कराराचे उल्लंघन करुन 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात क्रिकेटपटूला बदनामीकारक आरोप करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे.

तक्रारीतील आरोप आणि त्यासंबंधीची पुढील माहिती तपासण्यापूर्वी, प्रतिवादी क्रमांक 1 (एमएस धोनी) यांना सध्याचा खटला दाखल करण्याबाबत आणि मनाई आदेशाचा दावा सांगणे योग्य मानले जाते. न्यायाधीशांनी रजिस्ट्रीला प्रतिवादी क्रमांक 1 ला (एमएस धोनी) एक ईमेल जारी करण्यास सांगितले. अर्का स्पोर्ट्स कंपनी यांच्यातील करारामुळे हा खटला सुरु झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT