Yash Dhull Dainik Gomantak
क्रीडा

दिल्लीचे कोच म्हणाले...भारतीय संघात एन्ट्री करण्यासाठी 'धुल' सक्षम

दिल्लीचे प्रशिक्षक राज कुमार शर्मा (Raj Kumar Sharma) यांनी म्हटले की, 'दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या यश धुलने भारतासाठी खेळायला हवे.'

दैनिक गोमन्तक

तामिळनाडूविरुद्धच्या रणजी करंडक स्पर्धेतील एच गटातील सामना अनिर्णित राहिल्यानंतर दिल्लीचे प्रशिक्षक राज कुमार शर्मा (Raj Kumar Sharma) यांनी म्हटले की, 'दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या यश धुलने (Yash Dhull) भारतासाठी (Indian Team) खेळायला हवे.' भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार असणाऱ्या धुलने दिल्लीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात 113-113 धावा केल्या. आता 24 फेब्रुवारीपासून होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ झारखंडशी (Jharkhand) भिडणार आहे. (Delhi Coaches Say Indian Team Should Be Given A Chance To Yash Dhull)

दरम्यान, सामन्यानंतर विराट कोहलीचे (Virat Kohli) प्रशिक्षक शर्मा यांनी म्हटले, धुलचा भारतीय संघात लवकरात लवकर समावेश करण्यात यावा. तसेच त्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले की, “ त्याच्या आक्रमक खिलाडूवृत्तीचा विचार केल्यास तो भारतीय संघात खेळ्यासाठी सक्षम आहे. त्याला शक्य तितक्या लवकर टीम इंडियामध्ये संधी द्यावी. जेव्हा तो भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत वेळ घालवेल तेव्हा तो एक चांगला खेळाडू बनले.''

शर्मा पुढे म्हणाले, “यशने त्याला संधी मिळेल तेव्हा त्याच्या शानदार खेळीमधून सर्वांना दाखवून दिले आहे की, तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर वर्चस्व गाजवू शकतो. आणि विशेष म्हणजे तो क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी करु शकतो.”

ते पुढे म्हणाले, “त्याच्यासाठी हे स्वप्नवत पदार्पण होते. पहिल्या दिवशी आम्ही दडपणाखाली होतो. संदीप वॉरियरसारख्या गोलंदाजांविरुद्ध त्याने ज्या प्रकारे त्याने खेळी केली ती पाहण्यासारखी होती. तामिळनाडूने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी त्यामध्येही शानदार कामगिरी केली.''

दुसरीकडे भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि नवदीप सैनी हे झारखंडविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असतील. पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात इशांतचा समावेश करण्यात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT