Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: ताहलियाच्या धडाकेबाज खेळीवर फेरले पाणी, दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्यसचा उडवला धुव्वा

Delhi Capitals: मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये विजयी मोहीम सुरु ठेवली आहे.

Manish Jadhav

Delhi Capitals Women vs UP Warriorz, WPL 2023: मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 मध्ये विजयी मोहीम सुरु ठेवली आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीचा 60 धावांनी पराभव केल्यानंतर दिल्लीने मंगळवारी यूपी वॉरियर्सचा 42 धावांनी पराभव केला.

दरम्यान, लॅनिंगच्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने 212 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यूपीचा संघ 5 विकेट गमावून 169 धावाच करु शकला. यूपीकडून ताहलिया मॅकग्राने (नाबाद 90) सर्वाधिक धावा केल्या. एलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील यूपीने त्यांच्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा 3 गडी राखून पराभव केला होता.

तत्पूर्वी, दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 211 धावा केल्या. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीने चांगली सुरुवात केली. लॅनिंग आणि शफाली वर्मा (Shafali Verma) (17) यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. शफाली सातव्या षटकात ताहलिया मॅकग्राची बळी ठरली.

दुसरीकडे, मारिजन कॅपने (16) 11व्या षटकात सोफी एक्लेस्टोनला आपल्या जाळ्यात अडकवले. तिसरी खेळाडू म्हणून लॅनिंग 12व्या षटकात बाद झाली. तिला राजेश्वरी गायकवाडने क्लीन बोल्ड केले. लॅनिंगने 42 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावांची खेळी केली.

त्याचबरोबर, शबनम इस्माईलने 15 व्या षटकात अॅलिस कॅप्सीला (21) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर जेस जोनासेन आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी आघाडी घेतली. दोघींनी पाचव्या विकेटसाठी 67 धावांची शानदार भागीदारी करत दिल्लीला (Delhi) 200 च्या पुढे नेले. जोनासेनने 20 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या. त्याचवेळी, जेमिमाने 22 चेंडूत 34 धावांची नाबाद खेळी खेळली. तिने 4 चौकार मारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT