David Warner | Rishabh Pant | Delhi Capitals
David Warner | Rishabh Pant | Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

Delhi Capitals ने केली कॅप्टनची घोषणा! पंतची जागा घेणार 'हा' दिग्गज, तर अक्षर पटेलकडेही मोठी जबाबदारी

Pranali Kodre

Delhi Capitals Announced Captain for IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार आणि उपकर्णधाराची घोषणा केली आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर करणार आहे.

तसेच दिल्लीने अशीही माहिती दिली आहे की अष्टपैलू अक्षर पटेल उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळेल.

पंतच्या ऐवजी वॉर्नर

खरंतर ऋषभ पंत गेल्या दोन वर्षापासून दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार म्हणून काम पाहात होता. मात्र गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याचा गंभीर कार अपघात झाला. सध्या तो या अपघातात झालेल्या दुखापतींमधून सावरत आहे. त्यामुळे तो आगामी आयपीएल हंगामाला मुकणार आहे.

याचमुळे दिल्लीला त्याच्याऐवजी कर्णधारपदासाठी दुसऱ्या खेळाडूचा पर्याय शोधावा लागला. यासाठी वॉर्नरबरोबरच पृथ्वी शॉ याचेही नाव चर्चेत होते. याबद्दल अनेक चर्चाही होत होत्या की पंतची जागा घेणार कोण. पण अखेर गुरुवारी दिल्लीने वॉर्नरचे नाव कर्णधार म्हणून घोषित करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

या भूमिकेबद्दल वॉर्नर म्हणाला की 'ऋषभ दिल्लीचा चांगला कर्णधार राहिला आहे आणि आम्ही त्याला मिस करू. मी संघव्यवस्थापनेचे आभार मानू इच्छितो की त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास टाकला. ही फ्रँचायझी नेहमीच माझ्यासाठी घरासारखी राहिली आहे. मी आता प्रतिभाशाली खेळाडूंचा समावेश असेलल्या या संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. मी सर्वांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.'

गांगुली पुन्हा एकदा दिल्ली संघात

कर्णधार आणि उपकर्णधारपदाची घोषणा करण्याबरोबरच दिल्लीने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीची दिल्ली संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही गांगुलीने 2019 साली संघाचा मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यान, संघाचा मुख्य प्रशिक्षकपदावर रिकी पाँटिंग कायम आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल 2023 स्पर्धेसाठी संघ -

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिशेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल (उपकर्णधार), एन्रिक नोर्किया, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, मुकेश कुमार, इशांत शर्मा, रिली रुसोव, मनीष पांडे, फिल सॉल्ट.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT