भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूला (PV Sindhu) इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (Indonesia Open Badminton Tournament) उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

 
Dainik Gomantak
क्रीडा

Indonesia Open च्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूला पराभवाचा धक्का

गेल्या आठवड्यात इंडोनेशिया मास्टर्स (Indonesia Masters), ऑक्टोबरमध्ये फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभव झाला होता. मात्र, तिने टोकियो ऑलिम्पिकमध्येही उपांत्य फेरी गाठली होती.

दैनिक गोमन्तक

भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूला (PV Sindhu) इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या (Indonesia Open Badminton Tournament) उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बाली येथे आज झालेल्या तीन सामन्यात सिंधूचा थायलंडच्या रत्चानोक इंतानोनने (Ratchanok Intanon) 15-21, 21-9, 21-4 असा पराभव केला आहे. उपांत्य फेरीतील सिंधूचा हा सलग तिसऱ्यांदा पराभव ठरला आहे.

गेल्या आठवड्यात इंडोनेशिया मास्टर्स, ऑक्टोबरमध्ये फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभव झाला होता. मात्र, तिने टोकियो ऑलिम्पिकमध्येही उपांत्य फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूचा रचानोक विरुद्ध या सामन्यापूर्वी 4-6 असा विक्रम होता. परंतू गेल्या दोन सामन्यात सिंधुला अपयश आले.

या सामन्याच्या सुरुवातीला सिंधु 8-3 अशी आघाडीवर होती. पण त्यानंतर रत्चानोकने आक्रमक खेळ करत 9-10 असे गुण झाले, त्यामुळे ब्रेकपर्यंत सिंधूकडे फक्त एका गुणाची आघाडी होती. सिंधूने ब्रेकनंतर सलग तीन गुण मिळवले आणि रत्चानोकला कोणतीही संधी न देता पहिला आपल्या नावावर केला.

यानंतर दुसऱ्या गेममध्ये ब्रेकपर्यंत रत्चानोकने 11-7 अशी आघाडी घेतली. नंतर पुढली दहापैकी नऊ गुण मिळवत तिने दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने अनेक चुका केल्या, ज्याचा फायदा रत्चानोकने घेतला.

सिंधुने पहिला गेम 21-15 असा जिंकला, परंतु रत्चानोक इंतानोन हिने दुसरा गेममध्ये कमबॅककरत 21-9 ने आणि तिसरा गेम 21-4 ने जिंकत रत्चानोकने सिंधुचा पराबव केला. या स्पर्धेतील एकेरी विभागात उपांत्य फेरी गाठणारी पीव्ही सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू होती.

पीव्ही सिंधूने दक्षिण कोरियाच्या यू जिन सिमचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत पहिला गेम 14-21 असा गमावला होता. त्यानंतर सलग 21-19, 21-14 असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT