Football competition Dainik Gomantak
क्रीडा

मेव्हनच्या गोलमुळे एफसी गोवाची घोडदौड

धुळेर-म्हापसा पणजी फुटबॉलर्सविरुद्धच्या (Football) लढतीत ‘बायसिकल किक’ मारण्याच्या प्रयत्नात एफसी गोवाचा मेव्हन डायस

दैनिक गोमन्तक

पणजी: युवा स्ट्रायकर मेव्हन डायस याने पूर्वार्धात नोंदविलेल्या गोलमुळे FC गोवा डेव्हलपमेंटल संघाने गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी सलग दुसरा विजय नोंदविला. त्यांनी पणजी फुटबॉलर्सला 1-0 फरकाने निसटते हरविले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर (stadium) झालेल्या या लढतीत मेव्हनने 17 व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. मेव्हन हा मूळचा एफसी गोवा 18 वर्षांखालील संघातील खेळाडू. यंदा मोसमाच्या सुरवातीस त्याला डेव्हलपमेंटल संघात बढती मिळाली. निवड सार्थ ठरविताना या युवा स्ट्रायकरने सलग दुसऱ्या लढतीत गोल नोंदविला. मेव्हनने आदित्य साळगावकरच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी गोलरक्षकास गुंगारा दिला.

FC गोवाचे आता दोन लढतीतून सहा गुण झाले आहेत. अव्वल स्थानावरील वास्को क्लबच्या तुलनेत त्यांचा एक गुण कमी आहे. पणजी फुटबॉलर्सला तीन लढतीत दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्या खाती एक गुण कायम राहिला. पूर्वार्धातील पिछाडीनंतर पणजी फुटबॉलर्सने उत्तरार्धात बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु संधी साधणे त्यांना जमले नाही.

स्पोर्टिंग-चर्चिल ब्रदर्स सामना आज

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर गतविजेते स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यात लढत होईल. स्पोर्टिंगच्या खाती 3 लढतीतून 5 गुण असून चर्चिल ब्रदर्सने 2 लढतीतून 4 गुण नोंदविले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT