India Women Cricket Team X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs AUSW: दीप्तीचा भेदक मारा, 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला फोडला घाम; भारतासमोर 259 धावांचे लक्ष्य

Deepti Sharma: ऑस्ट्रेलिया महिला संघाने दुसऱ्या वनडेत भारतासमोर 259 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेतल्या.

Pranali Kodre

India Women vs Australia Women, 2nd ODI at Wankhede Stadium, Mumbai:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया माहिला संघात वानखेडे स्टेडियमवर वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (30 डिसेंबर) खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 259 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 बाद 258 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने अर्धशतकी खेळी केली. तसेच भारताकडून दिप्ती शर्माने 5 विकेट्स घेतल्या.

दीप्ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे, जिने वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून कर्णधार एलिसा हेली आणि फोबी लिचफिल्ड यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर हेलीला पुजा वस्त्राकरने १३ धावांवर बाद केले. त्यामुळे त्यांची ४० धावांची सलामी भागीदारी तुटली.

मात्र यानंतर एलिस पेरी आणि लिचफिल्ड यांनी डाव सावरला. दोघींनी अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर लगेचच पेरी ५० धावांवर बाद झाली. पाठोपाठ काही वेळातच बेथ मूनीलाही १० धावांवर दीप्ती शर्मानेच बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला.

यानंतर लिचफिल्डला ताहलिया मॅकग्राने साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, 34 व्या षटकात लिचफिल्डला पहिलाच सामना खेळणाऱ्या श्रेयंका पाटीलने चकवले. त्यामुळे ती अर्धशतक करुन बाद झाली. लिचफिल्डने 98 चेंडूत 63 धावांची खेळी केली.

त्यानंतर स्नेह राणाने ऍश्ले गार्डनरचाही अडथळा दूर केला. तिला 2 धावांवरच तिने बाद केले. तर ताहलिया मॅकग्राला दीप्तीने 40 व्या षटकात 24 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतरही ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम आणि ऍलेना किंग यांनी अखेरीस छोटेखानी खेळी करत झुंज दिली.

सदरलँडसने 23 धावा केल्या, तर वेरहॅमने 22 धावा केल्या अखेरीस ऍलेना किंग 28 धावांवर आणि किम गार्थ 11 धावांवर नाबाद राहिली.

भारताकडून दीप्ती व्यतिरिक्त पुजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT