Deepak Chahar Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: T20 मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका, 'स्विंग' चा सुलतान झाला दुखापतग्रस्त

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) श्रीलंकेविरुद्ध 2 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर श्रीलंकेविरुद्ध 2 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. स्नायूंना दुखापत झाल्यामुळे त्याने माघार घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो सामना अर्धवटच सोडून गेला होता. पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले की, “तो मालिकेतून बाहेर पडला आहे.'' (Deepak Chahar Has Been Ruled Out Of The Three Match T20 Series Against Sri Lanka)

दरम्यान, आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या आयपीएलपर्यंत (IPL) दीपकला (Deepak Chahar) तंदुरुस्त राहता येणार का हे पाहावे लागणार आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आधीच संघात असल्याने संघाने दीपकची रिप्लेसमेंट अजून तरी मागितलेली नाही.'

अशी दुखापत झाली

कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात दीपकला दुखापत झाली होती. डावाच्या तिसऱ्या षटकात आणि दुसऱ्या षटकात दीपक चहरला दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदान अर्ध्यातच सोडावे लागले. रनअपमध्ये धावताना त्याच्या पायांच्या स्नायूंमध्ये कळ आल्याने तो षटक पूर्ण न करता फिजिओच्या मदतीने पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर तो मैदानात परतलाच नाही. षटकाच्या पाचव्या चेंडूवर चहरने आधीच काइल मेयर्सला आपला बळी बनवले होते. या सामन्यात त्याने 1.5 षटके टाकली आणि 15 धावांत दोन गडी बाद केले होते. त्याने शाई होपची विकेटही आपल्या नावावर केली होती.

CSK ने लावली मोठी बोली

दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने IPL-2022 मेगा लिलावात 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 2017 पासून तो या संघासाठी खेळत होता. आता पुन्हा एकदा चेन्नईने चहरला आपल्या संघात घेतले आहे. दीपक 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल विजेत्या संघाचा महत्त्वाचा भाग होता. जर तो आयपीएलपूर्वीच दुखापतीतून सावरला नाही तर सीएसकेचे मोठे नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT