Cricket Dainik Gomantak
क्रीडा

दीपची प्रभावी फिरकी!

एलिट क गट चार दिवसीय सामन्यास सोमवारी सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर सुरवात झाली.

दैनिक गोमन्तक

पणजी : ऑफ स्पिन गोलंदाज दीप कसवणकर याच्या प्रभावी फिरकीमुळे 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट (Cricket) सामन्यात गोव्याने महाराष्ट्राचा पहिला डाव 287 धावांत गुंडाळला. दीपने 53 धावांत 5 गडी बाद केले. एलिट क गट चार दिवसीय सामन्यास सोमवारी सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर सुरवात झाली.

सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गोव्याने बिनबाद 9 धावा केल्या. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. फरदीन खान याने सलामीचे दोन्ही फलंदाज बाद केल्यामुळे त्यांची 2 बाद 46 अशी स्थिती झाली. नंतर शतकवीर एस. धस (114 धावा, 137 चेंडू, 12 चौकार व 6 षटकार) आणि दिग्विजय पाटील (69 धावा, 100 चेंडू, 11 चौकार, 2 षटकार) यांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) डाव सावरला. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या रचण्याची संधी प्राप्त झाली. उपाहारास खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 2 बाद 165 धावा केल्या होत्या. मात्र पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर त्यांना तिसरा झटका बसला. सुजय नाईक याने दिग्विजयला यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ याच्यांकरवी झेलबाद केले. दिग्विजय व धस जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली.

44 धावांत 7 गडी बाद

दिग्विजय बाद झाल्यानंतर धस याने शतक नोंदविताना ए. पवार यांच्या समवेत अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भर टाकली. दीप कसवणकरने पवार याला कर्णधार कौशल हट्टंगडी याच्याकरवी झेलबाद केल्यांतर महाराष्ट्राचा डाव गडगडला. चहापानापूर्वी शतकवीर धस यालाही कसवणकरने यष्टिरक्षक भुजबळ याच्याकरवी झेलबाद केले. महाराष्ट्राने 44 धावांत 7 विकेट गमावल्यामुळे त्यांचा डाव 287 धावांत संपुष्टात आला. पाच विकेट टिपलेल्या कसवणकरला सुरेख साथ देताना फिरकी गोलंदाज उदित यादव याने दोन गडी बाद केले. त्यामुळे महाराष्ट्राला त्रिशतकी धावसंख्या गाठता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र, पहिला डाव : 81.5 षटकांत सर्वबाद 287 (दिग्विजय पाटील 69, एस. धस 114, ए. पवार 25, अखिलेश गवाळे 21, फरदीन खान 18-3-68-2, सुजय नाईक 15-1-56-1, कौशल हट्टंगडी 5-1-13-0, मनीष काकोडे 8-0-48-0, दीप कसवणकर 21-9-53-5, उदित यादव 14.5-4-44-2).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur Celebration: नरकासुर प्रदर्शनावेळी पणजीत वाढला दणदणाट! आवाज 100 डेसिबलपेक्षा जास्त; नागरिकांच्या तक्रारी

Ravi Naik: स्मृतींचा जागर, आठवांचा गहिवर! 'रवीं'ना आदरांजली; मुख्‍यमंत्री, मंत्री, आमदार, हितचिंतकांचे अभिवादन

Diwali in Goa: नरकासुर वध, पाच प्रकारचे 'पोहे'; गोव्याची दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा पारंपरिक विजयोत्सव

Horoscope: घरात ऐश्वर्य आणि आनंदाचा वर्षाव, वातावरण अत्यंत मंगलमय राहील; दिवाळीच्या दिवशी कसा असेल तुमचा दिवस?

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

SCROLL FOR NEXT