Temba Bauma - Dean Elgar X/ICC
क्रीडा

South Africa vs India मालिका ठरणार माजी कर्णधारासाठी अखेरची! 36 वर्षीय दिग्गजाची क्रिकेटमधून निवृत्ती

Dean Elgar Retirement: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा 80 हून अधिक सामने खेळलेल्या दिग्गजाने केली आहे.

Pranali Kodre

South Africa former captain Dean Elgar announced retirement from international Cricket:

दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटी कर्णधार डीन एल्गारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सलामीवीर एल्गार भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून अखेरचे खेळताना दिसेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 26 डिसेंबर 2023 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिकेनंतर एल्गार निवृत्त होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनला 26 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान होणार आहे. तसेच दुसरा सामना 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान केपटाऊनला होणार आहे.

एल्गारच्या निवृत्तीबद्दल दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार एल्गारने म्हटले आहे की, 'ते म्हणतात ना की प्रत्येकी चांगल्या गोष्टीलाही शेवट असतो. भारताविरुद्ध मायदेशात होणारी मालिका माझी शेवटची असेल. मी या सुंदर खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाने मला खूप काही दिले आहे.'

'केपटाऊनमध्ये होणारा सामना माझा शेवटचा सामना असेल. जगातील ते माझे सर्वात आवडते स्टेडियम आहे. याच ठिकाणी मी न्यूझीलंडविरुद्ध माझी कसोटीतील पहिली धाव घेतली आणि आशा आहे की मी इथेच शेवटची धावही घेईल.'

'क्रिकेट खेळणे हे नेहमीच माझे स्वप्न होते, पण देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्यासारखी दुसरा आनंद नाही. मला 12 वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, हे माझ्या स्वप्नाच्या पलिकडील आहे. हा खूप शानदार प्रवास होता आणि मला जे मिळाले, त्याबद्दल मी सुदैवी आहे.'

एल्गारने 30 नोव्हेंबर 2012 रोजी पर्थला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात तो दोन्ही डावात शुन्यावर बाद झाला होता. पण नंतर केपटाऊनला त्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळला. ज्यात त्याने एका डावात खेळताना 21 धावा केल्या होत्या.

एल्गारने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 84 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे तो जर भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील दोन्ही सामने खेळला, तर त्याची कारकिर्द 86 कसोटी सामन्यांसह संपेल.

त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 84 कसोटी सामन्यात 37.28 च्या सरासरीने 5146 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 8 वनडे सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 104 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

एल्गारने 17 कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्वाही केले. या 17 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आणि 7 सामने पराभूत झाले, त्याचबरोबर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT