Dean Elgar  
क्रीडा

IND vs SA: ‘भारत को मेरी हड्डियां तोड़नी होंगी’, डीनच्या वचनाचा वडिलांकडून खुलासा

डीन एल्गरच्या (Dean Elgar) वडिलांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखात अदम्य धैर्याने जोहान्सबर्गमधील भारताविरुद्धची कहाणी वर्णन केली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडमध्ये सलमान खानच्या चित्रपटाचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे - 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता.' जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) ज्या धाडसाने भारतीय गोलंदाजांसमोर खंबीरपणे उभा राहिला, यामागे त्याने आपल्या वडिलांना दिलेले वचन होते. आणि हे वचन जोहान्सबर्ग (Johannesburg) जिंकण्याचे होते. या वचनाची पूर्तता एल्गरने आपल्या कामगिरीमधून करुन दाखवली. जोहान्सबर्ग कसोटीच्या चौथ्या दिवशी हवामान बदलल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर (South Africa) विजयासाठी 122 धावांचे लक्ष होते. तेव्हा कोणीही त्यांच्या विजयाबद्दल बोलत नव्हते. दुसरीकडे भारताला (Team India) 8 विकेट्सची गरज होती. परंतु, डीन एल्गर भारत आणि त्यांच्या विजयामध्ये दत्त बनून उभा राहिला. डीन एल्गरच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या त्यांच्या लेखात अदम्य धैर्याने जोहान्सबर्गमधील भारताविरुद्धची कहाणी वर्णन केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, चौथ्या दिवसाच्या खेळाच्या आदल्या रात्री एल्गरने वडिलांना सांगितले होते की, मी दुसऱ्या दिवसाच्या शेवटपर्यंत क्रीजवरच राहणार आहे. मला आऊट करण्यासाठी भारत को मेरी हड्डियां तोड़नी होंगी’. वडिलांच्या लेखानुसार, "डीन एल्गरने मला सांगितले की, जर भारताला त्याची विकेट हवी असेल तर त्याला अधू करावे लागेल. केवळ माझ्या शरीराला इजा करुन ते मला बाहेर काढू शकत नाहीत." वडिलांनी पुढे सांगितले, जेव्हा मी त्याच्याकडून हे ऐकले तेव्हा मला वाटले की आता तो पूर्णपणे चार्ज झाला आहे. आणि तो त्याच्या वचनबद्धतेपासून विचलित होणार नाही.

डीन एल्गरने 96 धावांची खेळी केली

जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात कर्णधारपदाची खेळी खेळताना डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेच्या 7 विकेट्सने शानदार विजयाची पटकथा लिहिली. एल्गर 96 धावांवर नाबाद राहिला. म्हणजेच, जोपर्यंत संघ विजयी होत नाही तोपर्यंत ते बाद झाले नाहीत आणि 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT