MS Dhoni | CSK Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: धोनीने सांगितले CSK च्या यशाचं रहस्य, 'सर्वोत्तम खेळाडूंची निवड करा अन्...'

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

सीएसकेच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत 223 धावा केल्या, त्यानंतर सीएसकेच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर डीसी संघ केवळ 146 धावाच करु शकला.

एकूणच, संपूर्ण संघाने CSK ला शानदार विजय मिळवून देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या विजयानंतर, CSK 14 सामन्यांतून 17 गुणांसह आणि 0.652 च्या रन रटने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर धोनीने संपूर्ण संघासह खेळाडूंच्या कामगिरीबद्दल सांगितले.

धोनीने मॅच प्रेजेंटेशनदरम्यान सांगितले की, ''यशाचं असं कोणतही गणित नाही. तुम्ही प्रयत्न करा आणि सर्वोत्तम खेळाडूंची निवड करा. त्यानंतर, त्यांना शानदार प्रदर्शन करण्यासाठी सर्वोत्तम स्लॉट द्या."

CSK व्यवस्थापनालाही श्रेय

धोनीने याचे श्रेय सीएसके व्यवस्थापनाला दिले. तो म्हणाला- 'व्यवस्थापनालाही याचे श्रेय जाते. ते नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतात, पण खेळाडू हे सर्वात महत्त्वाचे आहेत.

आम्ही खेळाडूंशिवाय काहीही करु शकत नाही. माझ्या मते डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. तुषार चांगली कामगिरी करत आहे. त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे.'

खेळाडूंनी वातावरणाशी जुळवून घ्यावे अशी आमची इच्छा आहे

धोनी पुढे म्हणाला- 'जेव्हा तुम्ही त्याच खेळाडूंवर विश्वास ठेवून खेळता तेव्हा त्याचा फायदा होतो. मला वाटतं गोलंदाजांनीही जबाबदारी घेतली आहे, डेथ ओव्हर्समध्ये पाथीराना शानदार गोलंदाजी करत आहे.

विशेष म्हणजे, तुषारचाही आत्मविश्वास दुणावला आहे. वैयक्तिक कामगिरीबद्दल काळजी न करता नॉकआउटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे.

बाहेरुन निर्णय घेणे कठीण असते, आम्ही खेळाडू आणि वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. खेळाडूंनीही वातावरणाशी जुळवून घ्यावे अशी आमची इच्छा असते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

SCROLL FOR NEXT