David Warner & Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: क्लास जुगलबंदी! वॉर्नरचं 'Sword' सेलिब्रेशन; जड्डूने दिली टशन, पाहा Video

IPL 2023 मधील 67 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

Manish Jadhav

IPL 2023 मधील 67 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

सामन्यादरम्यान डीसी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सीएसकेचा माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला.

जड्डू वॉर्नरला धावबाद करण्यासाठी घाबरवत होता. त्याचवेळी वॉर्नरही क्रीझच्या आत परतला नाही. त्याने जड्डूच्या स्टाईलमध्ये आपली बॅट तलवारीसारखी फिरवायला सुरुवात केली. या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, ही जुगलबंदी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) फलंदाजीदरम्यान पाहायला मिळाली. जडेजाच्या थ्रोवर वॉर्नरने डायव्ह केले आणि तो धावबाद होण्यापासून थोडक्यात बचावला.

चेंडू दुसऱ्या बाजूच्या खेळाडूच्या हातात होता. असे असतानाही वॉर्नर पुढची धाव घेण्यासाठी धावला. यादारम्यान तो धावबाद होण्यापासून बचावला.

वॉर्नर पुन्हा धाव घेण्यासाठी तयार असतानाच चेंडू आता जड्डूच्या हातात होता. मग काय जडेजा आणि वॉर्नर यांच्यात खास जुगलबंदी पाहायला मिळाली.

जड्डूने वॉर्नरला घाबरवण्याचा प्रयत्न केला, तोच दुसरीकडून वॉर्नरने त्याच्याच स्टाईलमध्ये तलवारीसारखी बॅट फिरवायला सुरुवात केली.

दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 223 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने आपले तीन गडी स्वस्तात गमावले. दिल्ली कॅपिटल्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT