David Warner Instagram
क्रीडा

David Warner: 'दुसरी बॅग देतो, पण...', निवृत्तीपूर्वी पदार्पणाची कॅप चोरीला गेल्याने वॉर्नर कासावीस

David Warner Baggy Green: निवृत्तीचा कसोटी सामना खेळण्यापूर्वी वॉर्नरने सांगितले आहे की त्याची पदार्पणाची कॅप असलेली बॅग चोरीला गेली आहे.

Pranali Kodre

David Warner request to return of stolen baggy green cap:

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवर डेव्हिड वॉर्नरने कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याच दरम्यान आता अशी माहिती मिळत आहे की त्याची ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय संघाकडून खेळताना घालायची बॅगी ग्रीन कॅप हरवली आहे.

खरंतर कोणत्याही राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडू सामन्यापूर्वी संघाची कॅप देण्यात येते. ही कॅप त्या खेळाडूसाठी प्रतिष्ठेची गोष्ट असते, त्यामुळे खेळाडू पदार्पणाची कॅप बऱ्याचदा सांभाळून ठेवतात. त्याचमुळे वॉर्नरही त्याच्या राष्ट्रीय संघाची कॅप चोरीला गेल्याने भावूक झाला असून त्याने याबद्दल सोशल मीडियावरही व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूला जी कॅप दिली जाते, त्या कॅपला बॅगी ग्रीन असेही संबोधले जाते.

दरम्यान, सिडनीमध्ये 3 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान ऑस्ट्रेलिया पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळणार आहे. हा सामना डेव्हिड वॉर्नरचा कसोटी कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना आहे. तो 12 वर्षांनंतर कसोटीतून निवृत्त होत आहे.

या सामन्यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नला ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना खेळले. पण त्यानंतर मेलबर्नवरून वॉर्नरची छोटी बॅग सिडनीला पोहोचलीच नाही.

त्याची छोटी बॅग मोठ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॅगच्या आत ठेवली होती. पण त्यातील छोटी बॅग गायब असल्याचे वॉर्नरचे म्हणणे आहे.

वॉर्नरने सोशल मीडियावर भावनिक अपील केले आहे. त्याने व्हिडिओ म्हटले की 'दुर्दैवाने माझ्याकडे हाच अंतिम उपाय आहे. कोणीतरी माझे सामान भरलेल्या बॅगमधून माझी बॅगपॅक काढून घेतली आहे. त्यात माझ्या मुलींनी दिलेल्या भेटवस्तू होत्या आणि त्यात माझी बॅगी ग्रीनही होती.'

'माझ्यासाठी त्या बॅगेचे भावनिक महत्त्व आहे. त्यात जे आहे ते पुन्हा मी माझ्या हातात घेणे आणि त्यासह या आठवड्यात फिरण्यास पसंत करेल. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जर तुम्हाला ती बॅगपॅक खरंच पाहिजे असेल, तर माझ्याकडे इथे एक अतिरिक्त बॅग आहे. तुम्ही माझी बॅगी ग्रीन मला परत द्या, मी तुम्हाला ही बॅग देईल.'

वॉर्नरने सांगितले आहे की त्याच्या पदार्पणाच्या दोन्ही बॅगी ग्रीन कॅप त्या बॅगमध्ये होत्या. वॉर्नर अखेरचा सामना सिडनीत खेळणार आहे, तर त्याने अखेरचा वनडे सामना वर्ल्डकप 2023 मध्ये खेळला आहे. दरम्यान, त्याने वनडे आणि कसोटीतून निवृत्ती घेतली असली, तरी तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये खेळणे कायम करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT