David Beckham Instagram
क्रीडा

IND vs NZ: हायव्होल्टेज भारत-न्यूझीलंड मॅचसाठी दिग्गज फुटबॉलर बेकहॅमची वानखेडेवर हजेरी?

World Cup 2023: भारत आणि न्यूझीलंड संघात बुधवारी वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा उपांत्य सामना वानखेडेवर रंगणार आहे.

Pranali Kodre

David Beckham may attend India vs New Zealand ICC ODI Cricket World Cup 2023 semi-final at Wankhede Stadium Mumbai:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. दोन्ही संघ वर्ल्डकप ट्रॉफीपासून आता अवघे 2 पावले दूर आहेत.

अशातच मुंबईला होणाऱ्या या हायव्होल्टेज सामन्यासाठी अनेक मोठे सेलिब्रेटी हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. यात इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम याचाही समावेश आहे.

बेकहॅम सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्याच्या उपांत्य सामन्यातील उपस्थितीची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्यासह अनेक आजी-माजी क्रिकेटपटू, सिनेस्टार आणि अन्य मान्यवर या सामन्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बेकहॅम हा UNICEF चा सदिच्छा दूत म्हणून भारतात आलेला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (ICC) UNICEF बरोबर क्रिकेटच्या माध्यमातून महिला आणि मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी केलेली आहे. त्याचमुळे बेकहॅम बुधवारी वानखेडे स्टेडियमवर दिसण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, भारताचा या वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शानदार खेळ झाला आहे. भारताने साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. न्यूझीलंडबाबत सांगायचे झाले, तर न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने पराभूत झाले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात धरमशाला येथे साखळी सामना झाला होता, ज्यात भारताने बाजी मारली होती. दरम्यान, या दोन संघात सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपचा उपांत्य सामना होत आहे. यापूर्वी वर्ल्डकप 2019 मध्येही उपांत्य फेरीत हे दोन संघच आमने-सामने आले होते. त्यावेळी न्यूझीलंडने विजय मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT