न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलने (Daryl Mitchell) ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली आणि नाबाद 81 धावा करून पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला. (Daryl Mitchell hit a six and the ball went straight into the beer glass Video)
पहिल्या दिवशी 147 चेंडूंचा सामना करताना त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकल आहेत. यातील एक षटकार स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या बिअरच्या ग्लासमध्येच पडला. आणि सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे.
जॅक लीचच्या डावातील 56व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिशेलने पुढे जाऊन लाँग-ऑन बाऊंड्रीकडे एक शॉट खेळला तर चेंडू सरळ जाऊन स्टँडमध्ये बसलेल्या महिला प्रेक्षकाच्या बिअरच्या ग्लासमध्ये जाऊन पडला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या मॅथ्यू पॉट्सने घडलेला प्रकार सांगितला.
मात्र, त्यानंतर न्यूझीलंड संघाने त्या महिला प्रेक्षकला बिअरचा नवा ग्लास पाठवला. खेळ संपल्यानंतर मिशेलने महिलेची भेट घेऊन माफी मागितली. मिशेलने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 108 धावांची शानदार इनिंग खेळली होती.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्या दिवसाचा सामना संपेपर्यंत 4 गडी गमावून 318 धावा केल्या होत्या. मिशेलशिवाय टॉम ब्लंडल 67 धावांवर पॅव्हेलियनमध्ये नाबाद परतला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.