West Indies Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: मालिका सुरु होण्यापूर्वीच 'या' खेळाडूने केली भविष्यवाणी

फेब्रुवारीमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा (West Indies) भारतावर वरचष्मा राहणार आहे.

दैनिक गोमन्तक

वेस्ट इंडिजचा संघ अद्याप भारत दौऱ्यावर आलेला नाही. तसेच भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुध्द मालिका खेळण्यासाठी अद्याप तयारीही सुरु केलेली नाही. परंतु, क्रिकेट जगतातील एका दिग्गज खेळाडूने याआधीच दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 (T20) मालिकेचा अंतिम निकाल दिला आहे. कॅरेबियन संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी (Darren Sammy) हा अनुभवी खेळाडू आहे, जो भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील मालिकेचा अंतिम निकाल ठरवत आहे. त्याच्या अंदाजानुसार, फेब्रुवारीमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा भारतावर वरचष्मा राहणार आहे. (Darren Sammy has said that West Indies will dominate the ODI and T20 series against Team India)

दरम्यान, 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजचा भारत दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यावरील पहिल्या एकदिवसीय मालिकेविरुद्ध सामने खेळवले जातील. त्यानंतर टी-20 सामने होतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) एकदिवसीय सामने होणार आहेत. तर टी-20 मालिका कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे.

पोलार्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संधी सोडवू शकतो - सॅमी

2 वेळा T20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकणाऱ्या कर्णधाराने पीटीआयला सांगितले की, "भारताचा संघ (Team India) मजबूत आहे, परंतु वेस्ट इंडिजकडे प्रत्येक संधी आहे." पोलार्डचा भारतात खेळण्याचा अनुभव संघाला खूप उपयोगी पडणार आहे, असंही सॅमी यावेळी म्हणाला. त्याच्या मते, “पोलार्ड भारताविरुद्धच्या संधींचा चांगला उपयोग करु शकतो. कारण त्याला भारतातील परिस्थिती माहीत आहे. त्याने भारतात भरपूर क्रिकेट खेळले आहे. ''

सॅमी पुढे म्हणाला की, “वेस्ट इंडिज सध्या इंग्लंडविरुद्ध मायदेशात मालिका खेळत आहे. अनेक नव्या खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात येणार आहे. जे भारताविरुद्ध आपली छाप पाडू शकतात. मला वाटते की वेस्ट इंडिजचा संघ भारतात दमदार कामगिरी करेल.''

घरच्या मैदानावर टीम इंडिया मजबूत

दुसरीकडे, केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका 0-3 ने गमावली. दक्षिण आफ्रिकेसोबत (South Africa) खेळलेल्या मालिकेत टीम इंडियाला संघर्ष करताना आपण पाहिले. या शेवटच्या मालिकेतील कामगिरीबाबत सॅमीला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘‘भारत घरच्या मैदानावर खेळत आहे. आणि घरच्या मैदानावर त्यांची कामगिरी उत्तम राहिलेली आहे. भारताकडे अनेक दिग्गज वनेड खेळणारे खेळाडू आहेत. केमार रोचच्या पुनरागमनामुळे वेस्ट इंडिज संघाला बळ मिळाल्याचे सॅमीने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT