रणजी ट्रॉफी 13 फेब्रुवारीपासून होणार सुरू : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

बोर्ड प्रमुखांनी दिलेल्या माहीतीनुसार, बीसीसीआय ही स्पर्धा 13 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा विचार करत आहे. रणजी करंडक स्पर्धा ही दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
Bcci President Sourav Ganguly
Bcci President Sourav GangulyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022 मध्ये होणाऱ्या रणजी ट्रॉफी च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे रणजी ट्रॉफी आयोजन करण्यात आले नव्हते. यावर्षी 13 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार होती, परंतु देशात कोरोना ची तिसरी लाट पाहता रणजी ट्रॉफी च्या तारखा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

मात्र, आता बीसीसीआयचे (Bcci)अध्यक्ष सौरव गांगुली यांनीच रणजी ट्रॉफी 2022 कधी सुरू होणार याबाबत सांगितले आहे. बोर्ड प्रमुखांनी दिलेल्या माहीतीनुसार, बीसीसीआय ही स्पर्धा 13 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा विचार करत आहे. तसेच या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Bcci President Sourav Ganguly
PSL 2022: पेशावर झल्मीच्या विजयाचा 'हिरो' शोएब मलिक

गांगुली (Sourav Ganguly) स्पोर्ट्स स्टारशी संवाद साधत स्पर्धेच्या सुरुवातीच्या तारिख झाहीर केली. यावेळी सौरव गांगुली Bcci President Sourav Ganguly म्हणाले की, सर्व संघांची विभागणी 5 गटात करण्यात येणार आहे. प्रत्येक गटात 6 संघ असतील. तर थाळी गटात 8 संघ असतील. यावेळी गांगुली म्हणाले की, 'आम्ही फेब्रुवारीच्या मध्यापासून रणजी ट्रॉफी सुरू करण्याचा विचार करत आहोत. आणि ही तारीख 13 फेब्रुवारी असू शकते. सध्या रणजी ट्रॉफीचा फॉरमॅट बनवला आहे तसाच राहणार आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा एक महिन्याचा असेल जो आयपीएल 2022 पूर्वी खेळला जाईल.'

जूनमध्ये होणार नॉकआउट मुकाबला

रणजी करंडक स्पर्धा ही दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात लीग स्तरीय सामने होतील तर नॉकआउट मुकाबला जूनमध्ये होणार आहे. ते म्हणाले की, '27 मार्चपासून आयपीएल (IPl) 2022 सुरू होणार आहे आणि अशा परिस्थितीत जून आणि जुलैमध्ये रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) नॉकआउट सामने आयोजित केले जातील. सध्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल होणार नाही. कोरोनाच्या बाबतीत, आम्ही सध्या सर्व गोष्टींचा विचार करत असून स्पर्धेसाठी योग्य ठिकाण शोधत आहोत असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com