India's boxer Nitu Ghangas advances to the finals of 48 kg category in Women's Boxing ANI
क्रीडा

CWG 2022: भारतीय बॉक्सर नीतूचा अंतिम फेरीत प्रवेश, रौप्य पदक निश्चित

भारतीय बॉक्सर नीतू घनघास हिने राष्ट्रकुल क्रीडा 2022 (45-48kg) मध्ये महिला बॉक्सिंगची उपांत्य फेरी जिंकली आहे.

दैनिक गोमन्तक

COMMONWEALTH GAMES: भारतीय बॉक्सर नीतू घनघास हिने राष्ट्रकुल क्रीडा 2022 (45-48kg) मध्ये महिला बॉक्सिंगची उपांत्य फेरी जिंकली आहे. या सामन्यात तिने कॅनडाच्या प्रियांका ढिल्लनचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. यासह भारताचे बॉक्सिंगमधील पहिले रौप्य पदकही निश्चित झाले.

तिसर्‍या फेरीत नीतूने कॅनडाच्या बॉक्सरवर इतके पंच मारले की रेफरीला थोड्या वेळासाठी खेळ थांबवावा लागला आणि नीतूला विजेता घोषित करावे लागले. याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही नीतूने अशाच पद्धतीने विजय मिळवला होता.

21 वर्षीय नीतू प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत आहे. ती भारतीय दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या व्हॅट श्रेणीत खेळत आहे. तिच्या पहिल्याच कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने एकामागून एक लढत जिंकून दमदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नीतूने आयरिश बॉक्सर क्लाईड निकोलवर आतके ठोसे मारले की तिला दोन फेऱ्यांनंतर विजेता घोषित करण्यात आले.

नीतू ही हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील धनना गावची आहे. ती आपल्या गावापासून 20 किमी अंतरावर असलेल्या धनाना येथील बॉक्सिंग क्लबमध्ये दररोज प्रशिक्षणासाठी जात असे. नीतूला बॉक्सर बनवण्यासाठी तिच्या वडिलांनी आपली नोकरी पण पणाला लावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT