Commonwealth Games 2022: वेटलिफ्टर नूह दस्तगीर बटने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या देश पाकिस्तानसाठी पहिले सुवर्णपदक जिकले. त्यानंतर त्याचे अभिनंदन करणाऱ्यांपैकी एक भारतीय सुपरस्टार मीराबाई चानू होती. ऑलिम्पिक पदक विजेती असल्याने चानूची उंची सुपरस्टार सारखी झाली आहे आणि तिच्याकडे केवळ भारतातच नाही तर शेजारील देशांमध्येही तितक्याच आदराने पाहिले जाते.
पुरुषांच्या 109 अधिक किलो वजनी गटात सुवर्णपदक (CWG) जिंकण्यासाठी विक्रमी 405 किलो वजन उचलल्यानंतर बटने पाकिस्तानी चॅनल पीटीआयला प्रतिक्रिया दिली. "ज्यावेळी मिराबाईने माझे अभिनंदन केले आणि माझ्या कामगिरीचे कौतुक केले तेव्हा हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता."
स्नॅचमध्ये 173 किलो, क्लीन अँड जर्कमध्ये 232 किलो आणि एकूण 405 किलो वजन उचलून पाकिस्तानी खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील तीनही गटात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. यावेळी "आम्ही मिराबाईकडे प्रेरणेने पाहतो. दक्षिण आशियाई देशांतून आपणही ऑलिम्पिक पदके जिंकू शकतो असा आत्मविश्वास आम्हाला मिराबाईकडून मिळाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले तेव्हा आम्हाला तिचा खूप अभिमान वाटला," असे पाकिस्तानी खेळाडू बटने सांगितले.
याच स्पर्धेत भारताच्या गुरदीप सिंगने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले आणि बट त्याला आपला चांगला मित्र म्हणतो. 'गेल्या सात-आठ वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही अनेक वेळा परदेशात एकत्र प्रशिक्षण घेतले आहे. आम्ही नेहमीच संपर्कात असतो,' असे म्हणत त्याने आपल्या भारतीय समकक्षांशी शेअर केलेल्या मैत्रीबद्दल सांगितले.
भारताच्या दोन सहली आणि आयुष्यभराच्या आठवणी
बट आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी दोनदा भारतात आला आहे. 2015 मध्ये प्रथमच पुण्यातील युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतरच्या वर्षी गुवाहाटी येथे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी आला होता. "मी दोनदा भारतात आलो आहे आणि प्रत्येक वेळी मला मिळालेला पाठिंबा संस्मरणीय आहे. मी पुन्हा भारतात परत जाण्यास उत्सुक आहे. मला वाटते की, पाकिस्तानपेक्षा भारतात माझे जास्त चाहते आहेत," असा विनोद करत बटने भारतीय चाहत्यांचे आभारही मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.