CWG 2022 Dainik Gomantak
क्रीडा

CWG 2022: भारताच्या शरथ कमल अन् साथियान ज्ञानसेकरन यांनी पुरुष दुहेरी टेबल टेनिसमध्ये जिंकले रौप्यपदक

भारताच्या शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांनी पुरुष दुहेरी टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022 |कॉमनवेल्थ गेमच्या 10 व्या दिवशी, भारतीय खेळाडूंनी त्यांची उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आणि टीम इंडिया पदकतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. अ‍ॅथलेटिक्स आणि बॉक्सिंगनंतर टेबल टेनिसमध्येही भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व गाजवले. (CWG 2022 India Sharath Kamal and Sathiyan Gnanasekaran win silver in men's doubles table tennis)

टेबल टेनिसच्या पुरुष दुहेरी स्पर्धेत इंग्लंडने भारतीय खेळाडूंचा पाच सेटपर्यंतच्या चुरशीच्या लढतीमध्ये पराभव केला. अचंता शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांनी पहिला सेट 11-8 असा जिंकून दुसरा आणि तिसरा सेट मात्र गमावला इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहल आणि लियाम पिचफोर्ड यांनी दुसरा सेट 11-8 आणि तिसरा 11-3 असा जिंकला आहे.

सलग दोन सेट गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पुनरागमन करत चौथा सेट 11-7 असा जिंकला आहे. मात्र, पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये इंग्लंडने भारतीय खेळाडूंच्या जोडीचा 11-4 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले तसेच टीम इंडियाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

यासह भारत आता कॉमनवेल्थ खेळांच्या पदकतालिकेत 49 पदकांसह (17 सुवर्ण, 13 रौप्य आणि 19 कांस्य पदके) चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT