टी 20 विश्वचषक 2021ची सुरुवात होऊन फक्त दोन दिवसच झाले असताना टूर्नामेंटमध्ये आत्तापासूनच खेळाडू, सहभागी झालेल्या टीम कमालीचे प्रदर्शन करताना दिसून येऊ लागल्या आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने (Scotland) बांग्लादेश (Bangladesh) पराभव करत अफलातून कामगिरी करुन दाखवली. तर सोमवारी आयर्लंडचा (Ireland) वेगवान गोलंदाज कर्टिस कैंफरने स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली. कर्टिस कैंफरने (Curtis Camper) नेदरलँड्सविरुद्ध (Netherlands) सलग 4 चेंडूत 4 बळी घेतले असून लसिथ मलिंगा, रशीद खान नंतर सलग 4 विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. कर्टिस कैंफरचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला असून त्याने तेथे अंडर -19 क्रिकेटही खेळले आहे. परंतु 2020 मध्ये तो आयर्लंडमध्ये स्थायिक झाला असून आता त्याने टी -20 वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला. कर्टिस कैंफरने नेदरलँडविरुद्ध 10 व्या षटकात हा पराक्रम केला. कैंफरने दुसऱ्या चेंडूवर कॉलिन एकरमनला बाद केले. यानंतर तो अनुभवी अष्टपैलू रायन डेस्काथेला बाद करण्यात यशस्वी झाला. तिसऱ्या चेंडूवर कानफरने स्कॉट एडवर्ड्सची विकेट घेतली आणि चौथ्या चेंडूवर त्याने व्हॅन डर मर्वेची विकेटही घेतली. कर्टिस कानफर टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक करणारा पहिला आयरिश खेळाडू ठरला आहे.
कर्टिस कैंफरने हॅटट्रिक कशी केली?
कर्टिस कैंफरचे पहिले षटक खूप महागडे ठरले. त्याने 6 चेंडूत 12 धावा दिल्या, ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. परंतु त्याच्या दुसऱ्या षटकात कर्टिस कैंफरने हा चमत्कार केला. आयरिश कर्णधाराने 10 व्या षटकात कॅम्परला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलावले. कैंफरने दुसरा चेंडू शॉर्ट स्लो चेंडू टाकला आणि त्याच चेंडूने अँकरमॅनला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर कैंफरने रायन टेन डेस्काथेला एलबीडब्ल्यू बाद केले. तिसऱ्या चेंडूवर, कैंफरने स्कॉट एडवर्ड्सविरुद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील केले होते मात्र पंचाने नाकारले. आयरिश कर्णधाराने एक आढावा घेतला आणि तो स्कॉट बाहेर असल्याचे दिसून आले. यासह कैंफरची हॅटट्रिक पूर्ण झाली. कैंफर इथेच थांबला नाही, त्याने सलग चौथ्या चेंडूंमध्ये व्हॅन डर मर्व्हचा बळी घेतला. असे त्याने चार बळी मिळवले.
कर्टिस कैंफर कोण आहे?
दरम्यान, कर्टिस कैंफर हा फक्त 22 वर्षांचा वेगवान गोलंदाज आहे. या खेळाडूचा जन्म 20 एप्रिल 1999 रोजी जोहान्सबर्ग येथे झाला. कैंफरने आपले सुरुवातीचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतच खेळला. तो 13 वर्षाचा असताना गोटेंगच्या संघात सामील झाला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघातही आपली चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. 2020 मध्ये, त्याने दक्षिण आफ्रिका सोडून आयर्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही पदार्पण केले. त्याच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये, कैंफरने फलंदाजी करत अर्धशतकेही ठोकली आहेत. त्याने पहिल्याच सामन्यात टॉम बॅंटनला चौथ्या चेंडूवर बाद केले. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला. आणि त्या सामन्यातही कैंफरने आपली क्षमता दाखवली होती. त्याने 8 एकदिवसीय डावांमध्ये 4 अर्धशतके ठोकली असून त्याची सरासरी 51.28 आहे. मात्र टी -20 मध्ये त्याने आतापर्यंत आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवलेला नाही. परंतु त्याच्या वेगवान गोलंदाजीने आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील फक्त 5 व्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग 4 चेंडूत 4 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.