CSK vs LSG IPL 2023: एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज आज 4 वर्षानंतर त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. धोनीसाठीही ही संधी खास असेल, तो येथे मोठा विक्रम करु शकतो.
हा विक्रम पूर्ण करण्यासाठी धोनीला फक्त 8 धावा कराव्या लागतील. तो 8 धावा काढताच आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तो 7वा खेळाडू ठरेल.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला, पण एमएस धोनीच्या बॅटमधून काही चांगले शॉट्स पाहायला मिळाले होते.
धोनीने 7 चेंडूत 14 धावांची खेळी खेळली होती. मात्र सध्या तो दुखापतीने ग्रस्त आहे. त्यामुळे तो आज कसा खेळतो हे पाहावे लागेल. धोनीने 8 धावा केल्या तर तो आयपीएलमधील 5000 धावा पूर्ण करेल. हा टप्पा गाठणारा तो CSK मधील दुसरा आणि IPL इतिहासातील 7 वा खेळाडू ठरेल.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएलमध्ये 235 सामन्यांमध्ये 4992 धावा केल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 84 धावा आहे.
धोनीने आयपीएलमध्ये 24 वेळा अर्धशतके झळकावली आहेत. धोनी पहिल्या हंगामापासून CSK चे नेतृत्व करत आहे. दरम्यान, सीएसकेवर दोन हंगामांची बंदी असताना धोनी पुणे सुपरजायंट्सकडून खेळला.
विराट कोहली (Virat Kohli) (RCB): 6706*
शिखर धवन (पंजाब किंग्स): 6284*
डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स): 5937*
रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स): 5880*
सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स): 5528
एबी डिव्हिलियर्स (आरसीबी): 5162
एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्स): 5992*
ख्रिस गेल (पंजाब किंग्स): 4965
रॉबिन उथप्पा (CSK): 4952
दिनेश कार्तिक (RCB): 4376*
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.