IPL 2026 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

Nathan Ellis ruled out of IPL 2026: आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये दमदार संघ बांधल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) चाहते संघाच्या 'कमबॅक'ची वाट पाहत होते.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये दमदार संघ बांधल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) चाहते संघाच्या 'कमबॅक'ची वाट पाहत होते. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धा सुरू होण्यास अवघे ८ दिवस शिल्लक असताना 'यलो आर्मी'ला एकापाठोपाठ एक दोन मोठे धक्के बसले आहेत. नॅथन एलिस पाठोपाठ आता संघाचा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर, बॅकअप खेळाडूही जखमी चेन्नईचा हुकुमी एक्का समजला जाणारा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस १९ मार्च रोजी दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी योग्य बदली खेळाडूचा शोध सुरू असतानाच, अष्टपैलू खेळाडू मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short) हा देखील दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, मॅथ्यू शॉर्ट याला आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. विशेष म्हणजे, त्याला डेवाल्ड ब्रेविसचा बॅकअप म्हणून संघात स्थान मिळाले होते, पण आता त्याच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईकडे केवळ ६ परदेशी खेळाडू शिल्लक राहिले आहेत.

कर्णधार ऋतुराज गायकवाड दबावाखाली नॅथन एलिस हा चेन्नईच्या गोलंदाजीचा कणा होता. त्याच्या जाण्याने संघाची गोलंदाजी कमालीची कमकुवत झाली आहे. त्यातच मॅथ्यू शॉर्टची दुखापत झाल्याने संघ निवडीचा पेच निर्माण झाला आहे. यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे. आता फिरकी विभागात आणि अष्टपैलू कामगिरीसाठी अकील हुसैनवर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

धोनी आणि संजू सॅमसनचा नवा प्लॅन या कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्यासाठी आता महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांना मिळून काहीतरी विशेष रणनीती आखावी लागणार आहे. संघाचा समतोल राखण्यासाठी भारतीय खेळाडूंवर अधिक भार टाकला जाऊ शकतो. चेन्नईचे व्यवस्थापन सध्या नॅथन एलिसच्या जागी कोणत्या दिग्गज खेळाडूला करारबद्ध करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT