MS Dhoni Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: जयपूर का आहे हृदयाच्या खूप जवळ? खुद्द कॅप्टनकूलनेच केला खुलासा

Video: राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर जयपूर खूप खास असल्याचे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सांगितले आहे.

Pranali Kodre

MS Dhoni on Jaipur Stadium: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 32 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात राजस्थानने दिलेल्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकात 6 बाद 170 धावाच करता आल्या.

या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने संघाच्या कामगिरीबद्दल आपले मत व्यक्त केले. तसेच जयपूरमधील स्टेडियमवर त्याच्यासाठी खास असल्याचेही सांगितले.

धोनीने म्हटले की राजस्थान रॉयल्सने विजयाच्या दृष्टीने चांगली धावसंख्या उभारली होती. तसेच चेन्नईने पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये आणि अखेरीस खूप धावा दिल्या. तसेच धोनीने यशस्वी जयस्वालच्या फलंदाजीचेही कौतुक केले. जयस्वालने या सामन्यात ७७ धावांची खेळी केली होती.

याशिवाय धोनीने चेन्नईचा युवा गोलंदाज मथीशा पाथिरानाचेही कौतुक करताना म्हटले की 'पाथिरानाने चांगली गोलंदाजी केली, जरी स्कोअरकार्ड त्याने किती चांगली गोलंदाजी केली, हे दाखवत नसले, तरी त्याने वाईट गोलंदाजी केलेली नाही.'

त्याचबरोबर चाहते आणि जयपूर स्टेडियमबद्दल बोलताना धोनी म्हणाला, 'बहुदा चाहते सगळीकडे माझा पाठलाग करत आहेत. मला वाटते मी विशाखापट्टणमला माझे पहिले शतक केले होते, त्यानंतर मला आणखी 10 सामने खेळण्याची संधी मिळाली. पण या मैदानावर केलेल्या 183 धावांच्या खेळीने मला मी आणखी एक वर्ष संघात राहिल हा विश्वास दिला. त्यामुळे हे ठिकाण माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.'

धोनीने त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना केले होते. त्यावेळी त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च नाबाद 183 धावांची खेळी केली होती. यापूर्वी त्याने एप्रिल 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध विशाखापट्टणमला त्याचे पहिले शतक केले होते. यानंतर सहा महिन्यांनी जयपूरमध्ये धोनीने ताबडतोड दुसरे शतक ठोकले होते.

जयपूरमध्ये झालेल्या त्या सामन्यात भारतासमोर 299 धावांचे आव्हान होते. यावेळी भारताने पहिल्याच षटकात सचिन तेंडुलकरची विकेट गमावली होती. पण त्यानंतर धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने तुफानी फलंदाजी करताना 145 चेंडूतच 183 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 षटकार आणि 15 चौकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे भारताने 46.1 षटकातच 299 धावांचे आव्हान पार केले होते.

या खेळीनंतर धोनीला मोठी लोकप्रियता मिळाली, तसेच भारतीय संघात स्थान पक्के करण्यातही त्याला मोठी मदत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT