MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: वेलकम थाला! फुलांची उधळण अन् ढोल-ताशांच्या गजरात 'कॅप्टनकूल' चेन्नईत दाखल; Video Viral

CSK संघाचा कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2023 स्पर्धेच्या तयारीसाठी चेन्नईत पोहचला असून त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

Pranali Kodre

MS Dhoni Back at Chennai for IPL 2023: इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाचे बिगूल वाजले आहेत. आयपीएल 2023 स्पर्धेला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

या हंगामाच्या तयारीला चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स संघाने (CSK) सुरुवातही केली आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी देखील या हंगामासाठी चेन्नईमध्ये पोहचला आहे.

धोनीचे चेन्नईत जोरदार स्वागत

सीएसके संघ त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर तब्बल 3 वर्षांनी खेळणार आहे. यापूर्वी सीएसके संघ चेन्नईत 2020 मध्ये खेळला होता. त्यामुळे हा हंगाम चेन्नईसाठी खास असणार आहे.

दरम्यान, सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी तमिळनाडूतील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे तो जेव्हा गुरुवारी चेन्नईत आला, त्यावेळी त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. तो विमानतळावर जेव्हा आला, त्यावेळी त्याला पाहाण्यासाठी अनेक चाहत्यांनी हजेरी लावली होती. तसेच त्याच्या स्वागतासाठी ढोल-ताशेही वाजवण्यात आले. तसेच फुलंही उधळण्यात आली. यावेळी चाहते त्याची एक झलक टिपण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसले.

सीएसकेचे खेळाडूही चेन्नईत दाखल

सीएसकेचा आयपीएल 2023 साठी लवकरच कॅम्प सुरू होणार आहे. या कॅम्पसाठी धोनीच नाही, तर सीएसके संघातील अन्य खेळाडूही बुधवार-गुरुवारपासून चेन्नईत दाखल होत आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, मुकेश चौधरी, तुषार देशपांडे अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

सीएसकेच्या सोशल मीडिया अकाउंटवर खेळाडूंच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करण्यात आले आहेत.

नेतृत्वबदल होणार का?

दरम्यान, सीएसकेचा संघ नेतृत्वाची धूरा धोनीव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडे सोपवणार का प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. खरंतर पहिल्या हंगामापासून सीएसकेचे कर्णधारपद धोनीने सांभाळले आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएलची 4 विजेतीपदेही जिंकली आहेत.

पण गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातील धोनीने सीएसकेचे कर्णधारपद जडेजाकडे सोपवले होते. मात्र, हंगामाच्या अर्ध्यानंतर जडेजाने नेतृत्वपद सोडले आणि पुन्हा धोनीने कर्णधारपद स्विकारले. त्यामुळे आता या हंगामात धोनी कर्णधारपद कायम करणार की अन्य दुसऱ्या खेळाडूकडे जबाबदारी सोपवणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सध्या धोनीनंतर सीएसकेचे कर्णधार सांभाळण्यासाठी बेन स्टोक्स आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना प्रबळ दावेदार समजले जात आहे. बेन स्टोक्सला चेन्नईने 16.25 कोटी रुपयांमध्ये आयपीएल 2023 लिलावात खरेदी केले आहे. पण स्टोक्स या हंगामात अखेरच्या टप्प्यात आयपीएल सोडून इंग्लंडच्या राष्ट्रीय संघासाठी खेळायला जाण्याची शक्यता अधिक आहे.

आयपीएल 2023 साठी चेन्नईचा संघ -

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथिशा पाथिराना , सिमरजीत सिंग, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी, महिश तिक्षणा, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, काइल जेमिसन, निशांत सिंधू, शेख रशीद, भगत वर्मा, अजय मंडल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT