Croatian Ivan Perisic's son and Neymar Dainik Gomantak
क्रीडा

Neymar: रडणाऱ्या नेमारला प्रतिस्पर्ध्याच्या लेकानेच दिला धीर, पाहा भारावून टाकणारा Video

ब्राझीलच्या पराभवानंतर क्रोएशियन खेळाडूच्या लहान मुलाने रडणाऱ्या नेमारला मिठी मारून धीर दिला.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत 13 डिसेंबरपासून उपांत्य फेरीचे सामने सुरू होतील. पण त्याआधीच या स्पर्धेतून पाचवेळचे विजेत्या ब्राझील संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांना शुक्रवारी क्रोएशियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.

क्रोएशियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर ब्राझीलचा दिग्गज खेळाडू नेमार भावनिक झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते, त्यावेळी क्रोएशियाचा खेळाडू इव्हान पेरिसिक याच्या मुलाने मैदानात येत नेमारला मिठी मारली. त्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

या सामन्यात निर्धारित वेळेनंतर सामना 0-0 अशा गोलफरकाने बरोबरीत सुटला होता. पण, भरपाई वेळेत नेमारने 105+1 मिनिटाला पहिला गोल नोंदवला. त्यावेळी ब्राझीलने जल्लोष केला. पण, नंतर क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोविकने 117 व्या मिनिटाला गोल साधत संघाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे हा सामना पेनल्टी शुटआऊटपर्यंत जाऊन पोहचला.

पेनल्टी शुटआऊटमध्ये ब्राझीलला 2 गोलच करता आले, तर क्रोएशियाने 4 गोल करत सामना आपल्या नावावर केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे ब्राझीलचा संघ नाराज झाला आणि त्यांचे खेळाडूही भावूक झालेले दिसले. यात ब्राझीलसाठी या सामन्यात पहिला गोल नोंदवलेला नेमारही होता.

नेमारने पहिला गोल नोंदवल्यानंतर अनेकांना ब्राझीलच उपांत्य फेरीत जाईल, असे वाटले होते. मात्र, क्रोएशियाने शेवटपर्यंत कडवी लढत, तर दिलीच पण सामनाही जिंकला.

पण, त्यानंतर पराभवाच्या दु:खाने रडत असलेल्या नेमारजवळ पेरिसिकचा मुलगा आला. त्याने नेमारला भेटण्यासाठी परवानगी घेतली आणि मग त्याने नेमारला मिठी मारून धीर देण्याचा प्रयत्न केला. या छोट्या मुलाने दाखवलेल्या या सहानुभूतीचे कौतुक होत आहे. या घटनेवर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, क्रोएशिया सध्या या स्पर्धेत अपराजित आहेत. आता त्यांना उपांत्य सामना अर्जेंटिनाविरुद्ध 13 डिसेंबर रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 डिसेंबरच्या मध्यरात्री 12.30 वाजता) खेळायचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: जानेवारीत गोयचो दौरो करप जालेंच, तर मेळूया गोयांनच! अट्टल गोंयकाराचे मराठी मन..

Manoj Bajpayee at IFFI: ‘..श्रीकांत तिवारी इज कमिंग’! इफ्फीत ‘द फॅमिली मॅन’चा खास शो; मनोज वाजपेयीची धाकड एन्ट्री

Horoscope: अनेक शुभ योगांचा दिवस! 'या' राशींची होणार चांदी; आज मिळणार गोड बातमी

Goa Politics: 'गोमंतकीय जनतेला भाजप सरकार नकोय'! आरजीपीचा हल्लाबोल; फुटीरांना पक्षप्रवेश नको याबाबत परब ठाम

Bhutani Project: भूतानी प्रकल्पाच्या बांधकामाला 'ग्रीन सिग्नल'! आरोप तथ्यहीन असल्याचे खंडपीठाचे निरीक्षण; याचिका फेटाळल्या

SCROLL FOR NEXT