Deepak Chahar Injury Updates | Will Deepak Chahar Play in T20 WC Dainik Gomantak
क्रीडा

क्रिकेटपटू दीपक चहर T-20 World Cup ला मुकणार?

दीपक चहर पाठीच्या समस्येने त्रस्त आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणारा दीपक चहर सध्या दुखापतीशी झुंज देत आहे. यामुळे तो आधीच आयपीएल 2022 च्या हंगामातून बाहेर पडला आहे. तो या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकातून देखील बाहेर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. (Cricketer Deepak Chahar suffers from back injury)

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दीपक चहर पाठीच्या समस्येने त्रस्त आहे. त्याचे स्कॅनिंग करण्यात आले. यामध्ये पाठीच्या दुखापतीमुळे दीपकला किमान 4 महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. अष्टपैलू दीपक चहरला फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T-20 दरम्यान पायाला दुखापत झाली आणि त्याला त्याचा 'स्पेल' पूर्ण न करता मैदान सोडावे लागले होते. यानंतर चहर श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) मालिकेत खेळू शकला नाही.

ही दुखापत थोडी अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळेच स्कॅननंतर दीपकला किमान 4 महिने क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. दीपक चहर गेल्या आयपीएल हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसला होता. चेन्नई फ्रँचायझीने दीपकला पुन्हा संघात घेण्यासाठी 14 कोटी रुपयांची बोली लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: सूर्ल येथे प्रस्तावित ईको टुरिझम प्रकल्पाच्या ठरावाला एकमताने मान्यता

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT