ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची (Pat Cummins) नियुक्ती करण्यात आली आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

अॅशेस मालिकेआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, पॅट कमिन्सची कर्णधारपदी निवड

संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे (Steve Smith) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

अॅशेस (Ashes) मालिका सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) संघासाठी नवीन कर्णधाराची निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट संघाचा नवा कर्णधार म्हणून पॅट कमिन्सची (Pat Cummins) नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही अधिकृतपणे नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. 64 वर्षांनंतर पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे (Steve Smith) उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया पॅनलने मुलाखत प्रक्रियेनंतर पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियन पुरुष कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. पूर्णवेळ कर्णधार बनलेला कमिन्स हा पहिला वेगवान गोलंदाज आहे.

तर दोन वर्षांपूर्वी चेंडू कुरतडण्या प्रकरणी स्मिथचे कर्णधारपद काढून घेऊन त्याला दोन वर्षे कर्णधारपदावरून दूर ठेवण्याचा निर्णय झाला होता. आता तीन वर्षांनी स्मिथवर पुन्हा एकदा त्याच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलिया पुरुष कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले असून, 64 वर्षांनंतर पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. कर्णधार रिची बेनॉड हा कोणत्याही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करणारा पहिला गोलंदाज होता. अॅशेस मालिकेसाठी स्टीव्ह स्मिथची संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. स्टीव्ह स्मिथच्या 2018 सँडपेपर गेट नंतर तो प्रथमच नेतृत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅट कमिन्सची नियुक्ती 2017 मधील सेक्सिंगच्या घटनेच्या खुलाशानंतर टीम पेनने सनसनाटीपणे कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर झाली आहे.

कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर कमिन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “ही भूमिका स्वीकारल्याचा मला सन्मान वाटतो. मला आशा आहे की टीम पेनने गेल्या काही वर्षांत संघाला जे नेतृत्व दिले आहे तेच नेतृत्व मी देऊ शकेन. हा एक अनपेक्षित विशेषाधिकार आहे ज्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे आणि खूप उत्सुकही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT