Australia Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

टीम इंडियाविरुद्ध WTC Final साठी ऑस्ट्रेलियाची घोषणा! स्टार ऑलराउंडरचे 4 वर्षांनी कमबॅक

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामन्यासाठी आणि ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी 17 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

Pranali Kodre

Australia Test Cricket Team: ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आगामी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामन्यासाठी आणि ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या संघात 17 खेळाडूंचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाला 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल मैदानावर भारतीय कसोटी संघाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीपटचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर 16 जूनपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची ऍशेस मालिका खेळायची आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात मिचेल मार्शचे तब्बल चार वर्षांनी पुनरागमन झाले आहे. मार्श गेल्या मागील काही महिन्यांपासून दुखापतींचा सामना करत होता. पण त्याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. आता त्याचा कसोटी संघातही समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंचेही ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. कमिन्स त्याच्या आईच्या निधनामुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांना मुकला होता, तर वॉर्नर दुखापतीमुळे हे सामने खेळला नव्हता.

अनुभवी वेगवान गोलंदाजांचा समावेश

ऑस्ट्रेलियाच्या 17 जणांच्या कसोटी संघात पॅट कमिन्सव्यतिरिक्त अनुभवी मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांचीही निवड झाली असून त्याच्यासह स्कॉट बोलंडलाही संधी देण्यात आली आहे. याबरोबरच या वेगवान गोलंदाजांबरोबरच अष्टपैलू कॅमरॉन ग्रीन आणि मिचेल मार्श हे अष्टपैलूही संघात आहे. हे दोघेही फलंदाजीबरोबरच वेगवान गोलंदाजीही करतात. त्याचबरोबर नॅथन लायन आणि टॉड मर्फी हे फिरकीपटू संघात आहेत.

त्याचबरोबर उस्मान ख्वाजा आणि वॉर्नर या सलामीवीरांबरोबरच मार्कस हॅरिस हा देखील सलामीसाठी एक पर्याय असणार आहे.

कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी 15 जणांचा संघ

दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडला रवाना होईल. त्यानंतर 28 मे रोजी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी 17 जणांच्या संघामधून 15 जणांचा संघाची अंतिम निवड केली जाईल.

ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा युरोप दौरा

  • 7 - 11 जून - कसोटी चॅम्पिटनशीप अंतिम सामना (विरुद्ध भारत) - द ओव्हल

ऍशेस मालिका २०२३ (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  • 16 - 20 जून - पहिली कसोटी - एजबस्टन

  • 28 जून - 2 जुलै - दुसरी कसोटी - लॉर्ड्स

  • 6 - 10 जुलै - तिसरी कसोटी - हेडिंग्ले

  • 19 - 23 जुलै - चौथी कसोटी - ओल्ड ट्रॅफोर्ड

  • 27 - 31 जुलै - पाचवी कसोटी - द ओव्हल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT