India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: सणांची पाकिस्तानच्या सामन्यांत आडकाठी! भारत-पाकिस्ताननंतर आता 'या' मॅचच्या तारखेतही बदल?

Pakistan Matches in World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याव्यतिरिक्त ऐन दिवाळीत होणाऱ्या पाकिस्तानच्या वर्ल्डकप 2023 मधील आणखी एका मोठ्या सामन्याच्या तारखेत बदल होऊ शकतो.

Pranali Kodre

Cricket Association of Bengal requested BCCI to Change Date of England vs Pakistan World Cup 2023 match:

भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या 13 व्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात काही मोठे सणही असल्याने आता सुरक्षेचा प्रश्न आहे. त्याचमुळे काही सामन्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

याचदरम्यान अशीही माहिती समोर येत आहे की बंगाल क्रिकेट असोसिएशिनने (कॅब) (CAB) बीसीसीआयकडे 12 नोव्हेंबरला आयोजित पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना हलवण्याची विनंती केली आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.

मात्र, त्याचदिवशी पश्चिम बंगालमध्ये काली पूजा आहे. बंगालमध्ये हा मोठा आणि प्रमुख सणांपैकी एक आहे. तसेच याचदिवशी दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन आहे. त्याचमुळे कोलकाता पोलिसांनी कॅबकडे सुरक्षेबद्दलची काळजी व्यक्त केली आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी कॅबच्या अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी पोलिसांनी सणाच्या दिवशी नियम आणि सुरक्षा याबद्दलची काळजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कॅबने बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना पत्र लिहून तारीख बदलण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, यामुळे हा सामना एक दिवस आधी 11 नोव्हेंबर रोजी घेतला जाऊ शकतो. तसेच अशीही माहिती मिळाली आहे की कॅबच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत चर्चा केली आहे.

यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप सामन्याचीही तारीख बदलली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण सध्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे हा सामना 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादला आयोजित करण्यात आलेला आहे.

मात्र 15 ऑक्टोबर रोजी नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याचमुळे हा सामना 14 ऑक्टोबर रोजी हलवला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय देखील वर्ल्डकप 2023 काही सामन्यांच्या तारखा बदलण्याची शक्यता आहे. पण अद्यात आयसीसी किंवा बीसीसीआयने सामन्यांच्या तारीख बदलांबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

तथापि, शाह यांनी यापूर्वीच सांगितले आहे की काही क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला सामन्यांच्या तारीख बदलांबद्दल पत्र लिहिले आहे. त्यामुळे बदल होण्याची शक्यता आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की 1996 वर्ल्डकपनंतर इडन गार्डन्सवर वर्ल्डकप सामना झालेला नाही. त्यावेळी भारत आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना स्टेडियममध्ये चाहत्यांना घातलेल्या गोंधळामुळे अर्धवटच थांबवण्यात आला होता आणि श्रीलंकेला विजेते घोषित करण्यात आले होते.

ज्यावेळी सामना थांबला होता, त्यावेळी भारतीय संघाने 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 34.1 षटकात 8 बाद 120 धावा केल्या होत्या.

दरम्यान, वर्ल्डकप 2023 च्या सध्याच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे इडन गार्डन्सवर 28 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स, 31 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, 5 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि 12 नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हे साखळी फेरीतील सामने खेळवले जाणार आहेत. तसेच 16 नोव्हेंबर रोजी होणारा उपांत्य फेरीतील सामनाही याच स्टेडियमवर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT