Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023 Schedule: सहा संघात रंगणार थरार! कधी आणि कुठे होणार भारताचे सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धा बुधवारपासून सुरु होणार असून या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Schedule annouced:  आशिया चषक 2023 स्पर्धेच्या आयोजनाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. पण अखेर या स्पर्धेला बुधवारपासून (30 ऑगस्ट) सुरुवात होत आहे.

पहिला सामना 30 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात मुलतानला खेळवला जाणार आहे. अंतिम सामना कोलंबोला 17 सप्टेंबरला खेळवला जाईल. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे खेळवला जाणार आहे.

याबरोबरच ज्याप्रकारे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, त्यानुसार जर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांनी प्रवेश केला, तर या दोन संघात 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे हा सामना होईल.

ही 16 वी आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट स्वरुपात खेळवली जाणार असून एकूण 13 सामने होणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि अंतिम सामन्यासह 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत.

सहा संघात रंगणार थरार

आशिया चषकात भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांची सुपर सिक्स फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर बी ग्रुपमध्ये गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

सुपर सिक्स फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.

पाकिस्तानमध्ये होणारे सामने

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चार सामन्यांमध्ये पहिल्या सामन्याशिवाय लाहोरला 3 सप्टेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान आणि 5 सप्टेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना होईल. तसेच सुपर फोर फेरीतील 6 सप्टेंबर रोजी होणारा सामनाही लाहोरला होईल.

उर्वरित सर्व सामने श्रीलंकेत कँडी आणि कोलंबोला होणार आहेत.

भारताचे सामने

आशिया चषकात सुपर सिक्समध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबर रोजी होईल. तसेच 4 सप्टेंबर रोजी भारताचा नेपाळविरुद्ध कँडीलाच सामना होणार आहे.

दरम्यान लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एसीसीने स्पष्ट केले आहे की सुपर सिक्स फेरीनंतर गुणतालिकेतील स्थान कोणतेही असले तरी ग्रुप ए मधून पाकिस्तानला ए1 आणि भारताला ए२ समजले जाईल. त्याचबरोबर जर या दोन्ही संघांपैकी कोणताही संघ सुपर फोरसाठी अपात्र ठरला, तर त्या संघाची जागा नेपाळ घेईल. ग्रुप ए प्रमाणेच ग्रुप बी मधून श्रीलंकेला बी१ आणि बांगलादेशला बी२ समजले जाईल. तसेच या दोन्ही संघांपैकी कोणताही संघ सुपर फोरसाठी अपात्र ठरला, तर त्या संघाची जागा अफगाणिस्तान घेईल.

आशिया चषकाचे वेळापत्रक

सुपर सिक्स

  • 30 ऑगस्ट - पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - मुलतान, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 31 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 2 सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 3 सप्टेंबर - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 4 सप्टेंबर - भारत विरुद्ध नेपाळ - कँडी, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 5 सप्टेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

सुपर फोर

  • 6 सप्टेंबर - ए1 विरुद्ध बी2 - लाहोर, पाकिस्तान (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 9 सप्टेंबर - बी1 विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 10 सप्टेंबर - ए1 विरुद्ध ए2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 12 सप्टेंबर - ए2 विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 14 सप्टेंबर - ए1 विरुद्ध बी1 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

  • 15 सप्टेंबर - ए2 विरुद्ध बी2 - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

17 सप्टेंबर - अंतिम सामना - कोलंबो, श्रीलंका (वेळ: दुपारी 3.00 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT