couple caught on camera kissing during ipl match picture went viral on internet Dainik Gomantak
क्रीडा

आयपीएल मॅचदरम्यान कपलचा किस सीन कॅमेऱ्यात कैद, फोटो व्हायरल

हे जोडपे एकमेकांना किस करण्यात होते व्यस्त

दैनिक गोमन्तक

आयपीएल (IPL) 2022 च्या 10 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या आणि दिल्लीला 172 धावांचे लक्ष्य दिले. मात्र, दिल्लीच्या संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 157 धावाच करता आल्या. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये असे काही घडले, ज्याची सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा आहे.

मॅचदरम्यान हे कपल किस करण्यात व्यस्त होते

या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये एक जोडपे कॅमेऱ्यात कैद झाले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे कपल किस करताना कॅमेरात कैद झाले. त्याचा फोटो सोशल मीडियावर येताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यात जबरदस्त सामना सुरू असताना दोन्ही संघांचे खेळाडू जिंकण्यासाठी मेहनत घेत होते. त्यानंतर स्टेडियममध्ये बसलेले हे जोडपे एकमेकांना किस करण्यात व्यस्त होते.

किस करतानाची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद

कॅमेरामन जेव्हा आपला कॅमेरा (Camera) प्रेक्षकांच्या दिशेने घेऊन जातो तेव्हा प्रेक्षकही कॅमेरात दिसावे यासाठी अनेक हालचाली किंवा हातवारे करतात. मात्र, या जोडप्याकडे पाहून कॅमेरा त्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून त्यांनी असे केले नसावे, अशी मते नेटकरी व्यक्त करत आहेत. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT