Alex Yee Twitter
क्रीडा

CWG 2022: या खेळाडूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकले पहिले सुवर्ण, पाहा VIDEO

न्यूझीलंडच्या हेडनला ही शर्यत जिंकता आली असती पण 10 सेकंदाच्या पेनल्टीमुळे तो अ‍ॅलेक्सच्या मागे पडला.

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022 1st Gold: बर्मिंगहॅम येथे 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्सचे पहिले सुवर्णपदक यजमान इंग्लंडला (England) देण्यात आले. पुरुषांच्या ट्रायथलॉनमध्ये पहिल्या दिवशी इंग्लंडच्या अ‍ॅलेक्स यीने (Alex Yee) सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. गेल्या वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅलेक्सचे या स्पर्धेत सुवर्णपदक अगदी जवळून हुकले होते. मागच्या वर्षी सिल्वर मेडलवर त्याला समाधान मानावे लागले होते.

24 वर्षीय अ‍ॅलेक्सने ट्रायथलॉन शर्यत पूर्ण करण्यासाठी 50 मिनिटे 34 सेकंद घेतले. त्याने आपला प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या हेडन वाइल्डचा 13 सेकंदांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हाऊसर तिसर्‍या स्थानावर असताना त्याने ट्रायथलॉन 50 मिनिटे 18 सेकंदात पूर्ण केली.

न्यूझीलंडच्या हेडनला ही शर्यत जिंकता आली असती पण 10 सेकंदाच्या पेनल्टीमुळे तो अ‍ॅलेक्सच्या मागे पडला. ट्रायथलॉनमध्ये खेळाडूंना पोहणे, सायकलिंग आणि धावणे यांमध्ये शर्यत करावी लागते. या तीन शर्यती कमीत कमी वेळेत टास्क पूर्ण करणाऱ्या खेळाडूला विजेता घोषित केले जाते.

कॉमनवेल्थ गेम्समध्‍ये पहिलं सुवर्ण जिंकल्‍यानंतर अ‍ॅलेक्‍सने ही आपली आजपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. एखाद्या मोठ्या क्रीडा स्पर्धेत आई-वडिलांसमोर धावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, 'मी खूप आनंदी आहे, ही माझी पहिली राष्ट्रकुल स्पर्धा आहे. मला या शर्यतीत शक्य तितके शांत राहायचे होते आणि इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करायचे होते. आता या पदावर पोहोचण्यासाठी मी खूप भाग्यवान समजतो.'

कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवशी 16 सुवर्ण पदकांसह 48 पदके पणाला लागली होती , ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 8 सुवर्णांसह 16 पदके जिंकली होती. ऑस्ट्रेलिया सध्या पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यजमान इंग्लंड 2 सुवर्ण आणि एकूण 9 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT