Harmanpreet Kaur Dainik Gomantak
क्रीडा

Commonwealth Games 2022: हरमनप्रीत कौर बर्मिंगहॅममध्ये करणार भारतीय महिला संघाचे नेतृत्व

भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी स्मृती मंधानाची निवड करण्यात आली. राष्ट्रकुल कॅलेंडरमध्ये महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दैनिक गोमन्तक

Commonwealth Games 2022: हरमनप्रीत कौर 28 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी कर्णधार म्हणून सज्ज झाली आहे. तर भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी स्मृती मंधानाची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रकुल कॅलेंडरमध्ये महिला टी-20 क्रिकेटचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी, 1998 च्या क्वालालंपूर कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांची एकदिवसीय स्पर्धा खेळली गेली होती.

यष्टिका भाटियाची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली

आगामी कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला संघात यष्टिरक्षक तानिया भाटियाची निवड झाली आहे. विकेटकीपर तानियाचा T20I फॉरमॅटमध्ये 100 पेक्षा कमी स्ट्राइक रेट आहे, तर दुसरीकडे, धडाकेबाज फलंदाज रिचा घोष यांना स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. दुखापतीमुळे श्रीलंका मालिकेला मुकलेल्या स्नेह राणाच्या राष्ट्रीय संघात पुनरागमनाने अनेकांचे लक्ष वेधले. दुखापतीमुळे स्नेह राणाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) पुनर्वसनासाठी ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर यास्तिका भाटिया यष्टिरक्षक म्हणून स्पर्धेत उतरणार आहे.

भारत अ गटात ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसोबत खेळणार

अनुभवी लेग-स्पिनर पूनम यादवला अद्याप संघात स्थान निश्चित नाही आणि ती वेगवान सिमरन दिल बहादूरसह स्टँडबाय यादीत आहे. भारत अ गटात ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस आणि पाकिस्तानसोबत खेळणार आहे. तर ब गटात श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला स्थान देण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना 29 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

श्रीलंका दौऱ्यावरून संघ परतला

भारतीय महिला संघ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सज्ज दिसत आहे. भारतीय महिला संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले पहिले सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करतांना दिसणार आहे. अलीकडेच भारतीय महिलांनी श्रीलंकेचा दौरा केला आणि भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमानांचा 3-0 असा पराभव केला.

भारतीय संघात या खेळाडूंना स्थान

भारतीय संघात हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना (VC), शफाली वर्मा, एस मेघना, तानिया भाटिया (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT