Commonwealth Games 2022 Twitter
क्रीडा

CWG 2022: अचिंता शेउलीने जिंकले वेटलिफ्टिंगमध्ये 'सुवर्ण'; भारताच्या खात्यात सहावे पदक

Commonwealth Games 2022: वेटलिफ्टर अचिंता शेउलीने पुरुषांच्या 73 किलो गटात भारतासाठी तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे.

दैनिक गोमन्तक

भारताच्या अचिंता शेउलीने (Achinta Sheuli) सुवर्णपदक जिंकत बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) तिरंगा फडकावला. कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी झालेल्या अचिंता शेउलीने भारताला तिसऱ्या सुवर्णपदक जिंकुन दिले. अचिंता शेउलीने पहिल्या लिफ्टमध्ये 137 किलो वजन तर दुसऱ्या लिफ्टमध्ये 139 किलोचा वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये अचिंता शेउलीने दुसऱ्या प्रयत्नात 170 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने 313 किलो वजन उचलून भारताला सहावं पदक मिळवून दिले. वेटलिफ्टर अचिंता शेउलीने पुरुषांच्या 73 किलो गटात भारतासाठी तिसऱ्या वेटलिफ्टिंग सुवर्णपदकाची (Goldmedal) कमाई केली आहे.

स्वत:साठीचं नाही तर देशासाठी योगदान दिल्या बाबत अचिंता शेउलीने आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक संघर्षांवर मात केल्यानंतर मी हे सुवर्णपदक जिंकले, हे पदक मी माझ्या भावाला आणि प्रशिक्षकांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रीया अचिंता शेउलीने सुवर्णपदक पटकावल्यानंतर दिलेली आहे. तसेच तो पुढे ऑलिम्पिकसाठी (Olympics) तयारी करणार असल्याची माहिती देखील माध्यमांना दिली आहे. याआधी रविवारी जेरेमी लालरिनुंगाने (Jeremy Lalrinnunga) वेटलिफ्टिंगमध्ये (Weight Lifting) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बर्मिंगहॅम 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला पुरुष खेळाडू तर अचिंता सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे.

2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत भारताला 6 पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. भारताच्या खात्यात सहा पदकांची कमाई करत भारतीय वेटलिफ्टिंग सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू (Mirabai Chanu), जेरेमी लालरिनुंगा, अचिंता शेली आणि कांस्यपदक विजेता गुरुराजा पुजारी (Gururaja Poojary) यांनी एकत्र येत फोटोसाठी खास पोझ दिली. तरी देशभरातून या सगळ्या स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT