Colin Munro Hug Ball-Boy X/thePSLt20
क्रीडा

Colin Munro: अफलातून कॅच घेणाऱ्या बॉल बॉयला मुनरोने आनंदात मारली मिठी, PSL सामन्यातील Video व्हायरल

Colin Munro hug ball-boy: पाकिस्तान सुपर लीगमधील एका सामन्यात कॉलिन मुनरोने एका बॉल बॉयला झेल घेतल्यानंतर मिठी मारत त्याचा दिवस खास बनवला आहे.

Pranali Kodre

Colin Munro Hug Ball-Boy:

पाकिस्तान सुपर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (4 मार्च) इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध पेशावर झालमी संघात सामना झाला हा सामना युनायटेडने 29 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो कॉलिन मुनरो.

मुनरोने या सामन्यादरम्यान एका बॉल बॉयला ज्याप्रकारे वागणूक दिली, त्याने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या सामन्यादरम्यान युनायटेडने पेशावर संघासमोर 197 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग युनायटेड करत असताना 19 व्या षटकात अरिफ याकूबने डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात एक मोठा फटका मारला. त्यावेळी तो चेंडू झेलण्यासाठी मुनरो येत होता. पण तो चेंडू सीमारेषेबाहेर जात होता.

तिथे सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या बॉल बॉयने तो चेंडू अप्रतिम झेलला. ते पाहून मुनरोने त्या बॉल बॉयला मिठीही मारली. हा चेंडू तो बॉल बॉय पकडत असताना मुनरोही पळत येत होता, त्यावेळी त्याने बॉल बॉयला लागणार नाही याची काळजी घेताना मुनरोने त्याच्यावरून उडी मारली होती.

दरम्यान, याच डावात आधी 7 व्या षटकात त्या बॉल बॉयकडून एक झेल सुटला होता. त्यावेळीही मुनरोने त्याचा धीर वाढवताना त्याला मिठी मारून त्याला काही सल्लेही दिले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच मुनरोने त्याच्या या कृतीने अनेकांची मनं जिंकली आहेत.

युनायटेडचा विजय

या सामन्यात युनायटेडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शादाब खानच्या 80 धावांच्या जोरावर 20 षटकात 4 बाद 196 धावा केल्या होत्या. मुनरोला फलंदाजीत मात्र 15 धावाच करता आल्या.

त्यानंतर 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पेशावरला 20 षटकात 9 बाद 167 धावाच करता आल्या. गोलंदाजी करतानाही शादाबनेच सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT