Sport Dainik Gomantak
क्रीडा

नेसायमध्ये क्रिडा संकुलाला नागरीकांची आडकाठी!

युनियनचे अध्यक्ष फिडेलीस फ्रेडी त्रावासो यानी मडगाव नगरपालिका परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व कागदपत्रे सादर करुन या जागे संबंधीची वस्तुस्थिती सांगितली.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : सां जुझे द आरियल पंचायतीतील नेसाय वाड्यावरील सर्वे नंबर 18/1 येथील अंदाजे 1 लाख 24 हजार चौरस मीटर जागा 2005 मध्ये क्रिडा अकादमी, सांस्कृतीक केंद्र तसेच इनडोअर स्टेडियम (Stadium) बांधण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी 15 हजार चौरस मीटर जागा ताब्यात घेण्याचा क्रिडा खात्याचा प्रस्ताव होता. पण आता या जागेवर 83 गाळे व 3 व्यापारी संकुलासाठी नगर नियोजन खाते व सां जुझे द आरियल पंचायतीने एका खाजगी बिल्डरला तांत्रीक व तात्पुरती मान्यता दिल्याने येथील नागरीक संतापले असुन सां जुझे द आरियल विलेजर्स युनियनच्या नावाखाली एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. युनियनचे अध्यक्ष फिडेलीस फ्रेडी त्रावासो यानी मडगाव (Margao) नगरपालिका (Municipality) परिसरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व कागदपत्रे सादर करुन या जागे संबंधीची वस्तुस्थिती सांगितली.

2005 साली क्रिडा खात्याने या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु करताना सर्व संबंधीत सरकारी खात्याना याची लेखी माहिती दिली होती. पण एप्रिल 2006 साली नगर नियोजन खात्याने सरकारला हा प्रस्ताव मान्य नसल्याचे तेव्हा कळविले. त्या नंतर क्रिडा खात्याने याच जागेवर 13 हजार चौरस मीटर जागेसाठी अर्ज केला. तेव्हा नगर नियोजन खात्याने या जागेचे क्षेत्र 16500 चौरस मीटर असल्याचे स्पष्ट केले. नंतर क्रिडा खात्याने 14 हजार चौरस मीटर जागेसाठी अर्ज केला. ही माहिती देताना त्रावासो यानी पुढे सांगितले की ही प्रक्रिया व कागदपत्रे पाहता या जागेसंदर्भात काही तरी घोळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

सप्टेंबर 2012 साली सां जुझे आरियल पंचायतीने एक ठराव मंजुर करुन ही जागा ताब्यात घेऊन क्रिडा संकुल व सांस्कृतीक केंद्र उभरण्यात येईल असे स्पष्ट केल. सप्टेंबर 2012 साली सां जुझे आरियल पंचायतीने एक ठराव मंजुर करुन ही जागा ताब्यात घेऊन क्रिडा संकुल (Sports packages) व सांस्कृतीक केंद्र उभरण्यात येईल असे स्पष्ट केले. नंतर नगर नियोजन खात्याच्या मडगाव कचेरीने प्रस्तावाला मान्यता दिली. पण त्यामध्ये जागेचे क्षेत्रफळ 86950 चौरस मीटर असे नमुद केले.

ही जागा प्रस्तावित क्रिडा संकुल व सांस्कृतिक केंद्रासाठी राखुन ठेवली आहे हे माहित असुनही नगर नियोजन खाते व सां जुझे द आरियल पंचायतीने जागेच्या सभोवताली कुंपण भिंत बांधण्यासाठी परवानगी दिली. त्याच बरोबर 83 गाळे व 3 व्यापारी संकुले बांधण्यासाठीही मान्यता देण्यात आली. 17 ऑक्टोबर 2021 या दिवशी झालेल्या ग्रामसभेत या जागेवर क्रिडा संकुल व सांस्कृतिक केंद्र (Cultural Center) उभारण्याचा व दिलेली मान्यता रद्द करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. मात्र तेथे बेकायदेशीर बांधकाम सुरु करण्यात आल्याचे व सर्व परवाने रद्द करण्याची सां जुझे द आरियल विलेजर्स युनियनने मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal President Resigned: पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यानंतर राम चंद्र पौडेल यांनी दिला राष्ट्रपती पदाचा राजीनामा; नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप!

Viral Video: माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, अर्थमंत्र्याला रस्त्यावर पळवून दिला चोप; नेपाळमधील भयावह व्हिडिओ पाहा

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT