Churchill Brothers in I league Dainik Gomantak
क्रीडा

चर्चिल ब्रदर्सला बरोबरीचा गुण मिळवण्यात यश

आय-लीगमध्ये पुर्वार्धातील पिछाडीवरून श्रीनिदी डेक्कनला रोखले

किशोर पेटकर

पणजी ः चर्चिल ब्रदर्सने पूर्वार्धातील एका गोलच्या पिछाडीवरून श्रीनिदी डेक्कन एफसी संघाला 1-1 असे गोलबरोबरीत रोखून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत एका गुणाची कमाई केली. सामना सोमवारी कोलकाता येथील कल्याणी स्टेडियमवर झाला.

विनीतकुमार वेलमुरुगन याने 16व्या मिनिटास श्रीनिदी डेक्कन संघाला आघाडी मिळवून दिली. नंतर साठाव्या मिनिटास ब्राईस मिरांडा याच्या असिस्टवर ताजिकिस्तानच्या कोमरॉन तुर्सुनोव याने शानदार व्हॉली फटक्यावर चर्चिल ब्रदर्ससाठी (Churchill Brothers) बरोबरीचा गोल केला. पूर्वार्धात आघाडीचा गोल (Goal) केल्यानंतर विनीतकुमार दोन संधी साधता आल्या नाही, त्यामुळे श्रीनिदी डेक्कनची आघाडी वाढू शकली नाही.

श्रीनिदी डेक्कन संघ सलग पाच सामने अपराजित राहिला. सोमवारच्या लढतीपूर्वी त्यांनी ओळीने तीन सामने जिंकले होते. त्यांची ही एकंदरीत दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे आठ लढतीनंतर 14 गुण झाले. गतविजेत्या गोकुळम केरळाचेही (Kerala) तेवढेच गुण आहेत, मात्र गोलसरासरीत कमी राहिल्याने श्रीनिदी डेक्कन संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम राहिला. चर्चिल ब्रदर्सनेही स्पर्धेत दुसरी बरोबरी नोंदविली. आठ सामन्यानंतर त्यांचे आठ गुण झाले आहेत. त्यांच्या गुणतक्त्यातील नवव्या क्रमांकात फरक पडला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT