Churchill Brothers strive for another victory in I-League
Churchill Brothers strive for another victory in I-League Dainik Gomantak
क्रीडा

I-League : चर्चिल ब्रदर्सचे आणखी एका विजयासाठी प्रयत्न

Kishor Petkar

I-League : चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील मागील लढतीत अव्वल स्थानावरील मोहम्मेडन स्पोर्टिंगला पराजित केले, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असून मागील तीन सामने अपराजित असलेल्या राजस्थान युनायटेडविरुद्ध गोव्यातील संघाचे विजयासाठीच प्रयत्न असतील. (Churchill Brothers strive for another victory in I-League)

चर्चिल ब्रदर्स व राजस्थान युनायटेड यांच्यातील सामना सोमवारी (ता. 21) पश्चिम बंगालमधील नैहाटी स्टेडियमवर खेळला जाईल. राजस्थान युनायटेडने मागील तीन सामन्यांत एकही गोल स्वीकारलेला नाही, त्यांनी बचावफळीत भक्कम खेळ केला आहे, त्यामुळे चर्चिल ब्रदर्सला गोल करण्यासाठी जास्त घाम गाळावा लागण्याचे संकेत आहेत.

राजस्थान युनायटेडने ऐजॉल एफसीला 1-0 फरकाने हरविल्यानंतर सुदेवा दिल्ली व इंडियन अॅरोज संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यांचे सध्या चार लढतीतून पाच गुण आहेत. दुसरीकडे सुदेवा दिल्ली व ट्राऊ एफसीविरुद्ध सलग पराभव स्वीकारल्यानंतर चर्चिल ब्रदर्सने मोहम्मेडन स्पोर्टिंगला 2-1 फरकाने नमवून सावरण्यात यश मिळविले. त्यांचे पाच लढतीतून चार गुण आहेत.

मागील लढतीतील विजय आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. बलाढ्य संघाविरुद्धच्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. त्या जोरावर आगेकूच करण्याची आणि सकारात्मक निकालाची आशा बाळगतो, असे चर्चिल ब्रदर्सचे सहाय्यक प्रशिक्षक मातेस कॉस्ता यांनी सांगितले. राजस्थान युनायटेड संघ तांत्रिकदृष्ट्या सरस असून आय-लीगमधील कोणत्याच संघाला कमी लेखता येणार नसल्याचे कॉस्ता यांनी मान्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mormugoa Port: खवळलेल्या समुद्रात बोटीचे इंधन संपले; मुरगावजवळ 24 पर्यटक आणि 2 क्रू सदस्यांना जीवदान

Goa Today's Live News: कोकण रेल्वेचे करमळी येथे लेक व्ह्यू रेस्टॉरंट; मडगावात रेंट बाईक सुविधा

Panaji Corporation : खोदकामांमुळे दोन महिन्‍यांपासून खावी लागतेय धूळ; रायबंदरवासीयांच्‍या नशिबी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’

Goa HSC CBSE Result 2024: अनिश कांबळी राज्यात अव्वल; बारावी परिक्षेत मिळवले ९८.२० टक्के गुण

Smart City Road : सांतिनेजमधील अर्धा टप्पा अपूर्ण; खरे आव्‍हान पावसाचे आणि रस्‍ते खचण्‍याचे

SCROLL FOR NEXT