Chris Gayle & AB de Villiers
Chris Gayle & AB de Villiers Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: एबी डिव्हिलियर्स अन् ख्रिस गेलचा RCB च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश

दैनिक गोमन्तक

दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) च्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या दोन्ही जवळच्या सहकाऱ्यांना 'हॉल ऑफ फेम'मध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली. फ्रँचायझीच्या वेबसाइटवर जारी केलेल्या निवेदनात कोहली म्हणाला, "डिव्हिलियर्सने त्याच्या अद्वितीय फलंदाजी, प्रतिभा आणि खिलाडूवृत्तीने क्रिकेटला नवा आयाम मिळवून दिला आहे." (Chris Gayle and AB de Villiers have been inducted into the Royal Challengers Bangalore Hall of Fame)

विराट म्हणाला, “तुम्हा दोघांसाठी ही घोषणा करणे माझ्यासाठी खूप खास आहे. गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये कशाप्रकारे परिवर्तन झाले ते तुम्ही पाहिले असेलच.'' डिव्हिलियर्स 2011 ते 2021 पर्यंत आरसीबीशी संबंधित होता, तर वेस्ट इंडिजचा (West Indies) डावखुरा फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) सहा वर्षे फ्रेंचायझीसाठी खेळला.

एबी म्हणाला, “हा एक विशेष सन्मान आहे. मी आनंदी आहे. माईक (Hesson), निखिल आणि फ्रँचायझीमध्ये सामील असलेल्या प्रत्येकासाठी ही खरोखर खास भावना आहे. एक संघ म्हणून आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला आहे. मी आणि ख्रिस आता संघात नाही, पण आम्ही अजूनही या फ्रंचायझीचा भाग आहोत आणि नेहमीच राहू.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT